लोहा ;प्रतिनिधी
लोहा येथिल प्रशासकीय ईमारतीवर भिमराव शिरसाठ या दिव्यांग शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली होती यामुळे चांगलेच वातावरण तापले होते.आत्महत्या का केली याचे गुढ अद्यापही कायम असले तरी शासनाच्या त्रासाला कंटाळुनच आत्महत्या केल्याचा अरोप कुंटुबांच्या वतिने करण्यात आला आहे.मन्याड फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी पिडित कुटुंबाना भेट देऊन सात्वंन केले.
भीमराव शिरसाठ यांची आत्महत्या नसून हत्या असुन या विषयी आवाज दाबल्या जात आहे.हि वेळ गप्प बसण्याची नसुन भिमराव सिरसाठ यांना न्याय देण्याची आहे. माजी सैनिक संघटना मयत भिमराव यांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले आहे.
प्रशासन खोटे बोलत असुन माझे पती कामासाठी तहसिल कार्यालयात चक्रा मारत होते अशा खुलासा मयत भिमराव शिरसाठ यांच्या पत्नीने केला असल्यने आता प्रकरणाला नवे वळण लागणार आहे