लोहा(विनोद महाबळे)
लोहा तालुक्यातील माळाकोळी ते मंचूतांडा पाटी पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्तीची कामे चालू असून कोट्यावधी रुपये शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहेत माळाकोळी ते मंचू तांडा रस्त्याचे सुधारणा काम करण्यात येत असताना गुतेदाराने या रोडचे काम अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाची करत असून साईट पट्ट्या भरताना काळा मातीचा वापर करण्यात आला आहे तर बाजूलाच खोदून त्यावरती थोड्याफार प्रमाणात मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आला आहे.
मशिनरी चा वापर करून निविदेतील लेबर अग्रीमेंट प्रमाणे काम केले नाही रस्त्याच्या बाजूची काळी माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती टाकलेली आहे माळाकोळी ते मंचू तांडा पर्येंत सध्या काम चालू असून दुरुस्त करताना अनेक ठिकाणी साईट पट्ट्यावर काळी माती टाकून डांबर करण्याअगोदर साईट पट्ट्या भरले आहेत तर त्यावर असलेली गीटी आणि चुरी ही इस्टीमेंट प्रमाणे नाही वरील रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करून मोरे कंट्रक्शन ने स्वतः आर्थिक हिता पोटी सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसे कमवण्याचा गोरखधंदा केला आहे हा रस्ता काही दिवसातच उघडून जाण्याची चिन्हे आहेत म्हणून मे मोरे कंट्रक्शन यांना काळा यादीत टाकून सदर कामाची गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करण्यात यावी व या रस्त्याची इस्टीमेंट आहे त्याप्रमाणे काम करण्यात यावे जोपर्यंत गुणनियंत्रण यंत्रणेमार्फत अहवाल सादर होत नाही तोपर्यंत त्यांचे कोणतेही बिल अदा करू नयेत अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेच्यावतीने आपल्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनूरकर यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे .