कंधार ; प्रतिनिधी
येथिल ग्रामिण रुग्णालयातील अजब कारोभार समोर आला असून शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गेल्या चार दिवसापासुन जेवनच दिले नसल्याने माजी सैनिकांनी आज मंगळवार दि.२० जुलै रोजी प्रत्यक्ष दवाखान्यात भेट देवून प्रशासना विरोध आवाज उठवला आहे.
कंधार चे भुमिपुत्र नांदेड जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या अख्तरीत असलेल्या ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना सोई सुविधेसाठी कोरोना काळात पायपीट करावी लागत आहे.शासनाच्या मिळणाऱ्या सुविधा ह्या केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष विविध योजनाची अमल बजावणी मात्र होताना दिसत नाही.अशाच एक अजाब प्रकार नुकताच समोर आला असून ग्रामिण रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना चार दिवसापासुन जेवनच दिले नसल्याने माजी सैनिकांनी आज दि.२० जुलै रोजी आवाज उठवला आहे.
माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी व माजी सैनिक कंधार तालुका उपाध्यक्ष शेख अजीज यांनी भेट देवून प्रशासनाला धारेवर धरले.व वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांना संपर्क करुन या प्रकरणा वेळीच लक्ष घालण्याच्या सुचना केल्या. तसेच जेवणाचा डब्बा पुरवणारे गुत्तेदार यांनी सकस आहार वेळेवर पुरवण्याचे आवाहन केले अन्यथा या प्रकरणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहीती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले.