माझ्या सदभक्तांशी संवाद साधण्याच्या निमित्याने आषाढ वारीच्या आधी माझे आत्मकथन सुंदर अक्षर कार्यशाळेच्या मध्यस्तीने आपल्या पर्यंत पोहंचवित आहे. जगातील सर्व सदभक्तांना आषाढ अन् कार्तिक वारीची उत्कंठता असते.या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात आषाढ वारी सापडली आहे.माझ्या पंढरीत भक्तांची मांदीयाळी चंद्रभागेच्या वाळवंटात युगे अठ्ठविस वर्षापासून दिसते.यंदा मात्र हे दृश्य दिसणार नाहीच?माझ्यात आणि माझ्या सदभक्तांत कोवीड-19 वायरस आल्यामुळे आषाढ वारी साधे पणाने होत आहे.माझ्या दर्शनास पायी येणार्यां हजारों दिंड्या आपली परंपरा या वर्षीचे संकट पाहता शासनाच्या आदेशाने रद्द झाल्या.पण माझ्यावर असलेली वारकर्यांची निस्सीम भक्ती गेली 700 वर्षापासून अगाध आहे.
माझी शासकिय पुजा मुख्यमंत्री महोदयांच्या समर्थ हस्ते होते त्या पेक्षा त्यांच्या सोबत असवेल्या वारकरी दांपत्याची समर्थ हस्ते होते ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट!आषाढ वारी असो वा किर्तिकी वारी असो.भक्तांच्या खांद्यावर भगवी पताका,हातात टाळाचा निनादा सोबत मृदंगावरी थाप पडताचे विणेच्या मधुर हलक्या अखंड आवाजाने वारकरी देहभान विसरुन संसाराचे दु:ख बाजुला सारुन ठेक्यावर पावलीच्या धुंदीत पंढरीकडे आगेकुच करण्याचा आनंद अवर्णनीयच!पंढरीत दाखल झाल्यानंतर अतूरता असते ती चंद्रभागेतील अभ्यंग स्नानाची त्या नंतर माझ्या दर्शनाची कांही वारकरी दर्शन रांगेचे रुप पाहता कळसाच्या दर्शनाने समाधान होतात.कळसाचे दर्शनाची प्रथा साने गुरुजींच्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहा नंतर रुढ झाली!तर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तत्कालीन कंधार आमदार यांनी विधानसभेत प्रश्न मांडून शासनाकडून मंजुर करुन घेतला.आजही महिलांना विठ्ठल मंदिरात दर्शन खुले झाले.
माझी भक्त मंडळी संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज, संत सोपान काका,संत निळोबाराय,संत चोखाबाजी,संत गोरा कुंभार,संत सावता माळी,संत शेख महम्मद,संत नामदेव,संत कान्होपात्रा,संत जनाई,संत मुक्ताई,संत साधु महाराज,संत दुंडा महाराज,भक्त पुंडलिक या सह संत महात्म्ये सर्व जाती-धर्मात आहेत फक्त वारकरी सांप्रदायच, जातीयतेला मुठ माती देणारा !
हे संकट फक्त माझ्या दिंड्यावर किंवा माझ्यावरच नसुन सर्व मानव जातीला संकट उत्पन्न करणारे आहे.यात कारखाने,उद्दोगधंदे,व्यापार,मजुरदार,कष्टकरी,शेतकरी या सर्वांना झळ पोहंविणारे म्हणेजे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळ करणारी आहे,राज्यातली तर होतच आहे पण देशाचीही होत आहे.आपल्या राज्यातल्या शाळा ग्रामीण
भागात सुरु झाले,शहरे व महानगरातील शाळा बंदच आहेत.दहावी व बारावीचा निकाल परीक्षा न देताच लागला हे दु:खद आहे.या पेक्षा मला काळजी आहे ती,चिमुकल्यांची कारण पहिल्या वर्गात प्रवेशीत झालेला विद्यार्थी तिसरीत गेलाय परिक्षा न देताच! 12 मार्च 2020 पासून आजता गायत बंद आहेत.सरकारला कोणताही ठाम निर्णय घेता येत नाही.येथुन पुढे जवळपास दिवाळी पर्य॔त म्हणजे प्रथम सत्रात शाळा होतील का नाही?याची शाशंकता आहे?हे संकट लावकरात लवकर जाण्यासाठी सोशल डिस्टन्स व एखादी लस निघाल्या नंतरच फरक पडेल अन्यथा कोरोना सोबत-सोबत जगावे लागेल?
माझे अस्तित्व जळी,स्थळी,काष्टी,पाषाणी सर्वत्र माझे वास्तव्य आहे.फक्त समजण्याची दृष्टी पाहिजे.माझे अस्तित्व सर्वत्र आहे.दिंडीत येवून दर्शन तर घेताच, फक्त परिस्थिती आणीबाणीची असल्यामुळे आपण आपल्या घरीच राहून माझी आळवणी करुन आषाढी एकादशी साजरी करा.आता तर दिंडीचा आनंद शिगेला पोहंचलेला असायचा,या आनंदावर कोरोनाचे विरजन पडल्यामुळे आपण वारकरी एकत्रीत पंढरीत येवून माझ्या दर्शनाचा आनंद मुकला आहे.
खांद्यावरती भगवी पताका।
मुखी मझ्या नामाचा गजर॥
दिंडीत पायी-पायी चालतांना।
टाळ-मृदंगाच्या निनादात॥
निखळ भक्तीचाच जागर॥
पंढीरीत वारकरी आल्याने।
भीमातीरी मादीयाळीचा आगर॥
जात,पात,धर्म,पंथ विरहित।
भक्तीची भरला जणु सागर॥
कोरोना महामारीच्या संकटात।
दिसेना नाम स्मरणाचा ज्वर॥
घरीच राहून आषाढी एकादशी।
करा,येईलच आनंदाला बहर॥
मझ्या तमास वारकरी सांप्रदायाने शासनानाने दिलेल्या आदेशाचे पालन करत वारकरी किती एकजुटीने असतात याचा प्रत्येय महाराष्ट्र शासनाला आला.पंढरी भीमातीरी भक्तांची मांदीयाळी वर्तमानी दिसणार नाही.कांही दिवसानंतर परिस्थिती बदलणार आहे.येणारी कार्तिक मासातली कार्तिकी एकादशीच्या औचित्याने आपल्या हा गेलेला आनंद व्दिगुणीत करता येईल.देवशयानी म्हणजे आषाढी एकादशी दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी,कष्टकरी,व्यापारी,पिक-पाणी या साकडे घालतात!यंदा मात्र पाऊस पाणी मुबलकच आहे.तिसरी लााट येण्याच्या
माझ्या तमाम ह.भ.प.,संत मंडळी,वारकरी,टाळकरी,विणेकरी,झेंडेकरी,भालदार-चोपदार,मठाधिपती,किर्तनकार, प्रवचनकार.माझे सर्व सदभक्त मंडळींना माझा शुभाशिर्वाद…..! या वर्षी कोराना संकटकाळी तुम्ही सुरक्षित राहून आपल्या जवळील आप्तस्वकियांना सुरक्षितता द्यावी.येणार्यां आषाढ,श्रावण अन् भाद्रपदात येणारे सर्व सण-उत्सव घरीच राहून साजरा करा.”ऐकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ”या उक्ती प्रमाणे कोरोना संकटकाळी आपण घरात राहून प्रशासनला सहकार्य करा!मला कंधारच्या सुंदर अक्षर कार्यशाळेने बोलकं केले.पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय॥ हे गाभार्यातील ऐकुण-ऐकुण माझ्याही अंग वळणी पडले.
आतमकथनकार
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार