(शल्यकार- दत्तात्रय एमेकर गुरुजी,कंधार)
#yugsakshilive.in
माझ्या देशात पुर्वी राजेशाही होती.त्याच वेळी व्यापाराच्या निमित्याने इंग्रज आले,अन् राज्यकर्ते बनले.यांची सत्ता भारतीयांना गुलामाची वागणुक देत.त्यावेळी जहाल मतवादी अन् मवाळ मतवादी विचारांच्या देशभक्तांनी स्वातंत्र्य लढा तब्बल दिडशे वर्ष चालवून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले.तेंव्हा पासुन आज पर्यत माझे ध्वजारोहण आनंदाने सर्व देशात, लाल किल्ला येथील प्रमुख ध्वजारोहण पंतप्रधानांच्या समर्थ हस्ते मला फडकवले जाते.कांही प्रतिष्ठीत,मंत्री महोदया सहित जवळपास 2000 शालेय विद्यार्थी अन् पंतप्रधानांना गार्ड-ऑफ-ऑनर देण्यासाठी माझ्या देशाचे सैनिक, तिनही दलाचे प्रमुखा सहित हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी देशवासीयंची तोबा गर्दी असते.
विद्यापिठे महाविद्यालय,शाळा,कार्यालये,ग्राम पंचायत कार्यालये,सेवासोसायटीची कार्यालये आणि देशात लाखो ठिकाणी मला दिमाखदार सोहळ्या फडवले जाते.त्यावेळी विद्यार्थी,पालक,अधिकारी,मंत्री,राजकिय क्षेत्रांतील मान्यवर,सर्व सामान्य देशवासीय उपस्थित राहुन माला मानवंदना देत, अगदी दिमाखदार सोहळ्यात फडकवले जाते.मी आकाशात ध्वजदंडावर फडकत असतांना मला अभिमान वाटतो.पण यंदाचा स्वातंत्र्य दिन कोरोना संकटकाळात आल्यामुळे मी तर फडकणारच आहे,पण त्यासाठी शासनाची नियमावली आहे.जास्त गर्दी नकरता,सोशल डिस्टन्सिंग,तोंडाला मास्क,सॅनिटाईजर या नियमांचे काटेकोर पालन करुन मला फडकवल्या जाणार आहे.मी तर दिमाखात फडकणार आहेच पण मला दु:ख या गोष्टीचे आहे.देशाचे भविष्य म्हणुन ज्यांच्याकडे पाहिल्या जाते.ते माझे प्रिय विद्यार्थीच राहणार नाहीत ही खंत मला सतावते आहे.ते विद्यार्थी माझ्या ध्वजारोहणास उत्सूक असतात.भल्या पहाटे स्वातंत्र्यदिनी उठुन निटनेटक्या पोषाखात माझे स्वागत व माझे रोहण करण्यास आतूर असतात.माझ्या ध्वजारोहणा आधी देशभक्तीपर गीतांनी रोमारोमात देशभक्तीचे विद्युत संचारते हे मात्र दिसणार नाही?याची खंत मला आठ दिवसा पासुन सतावते आहे.मला प्रत्येक ध्वजदंडावर फडकवले जाईल पण, वातावरण विद्यार्थी विना अधुरे आहे.असेच महाराष्ट्र दिनी माझे रोहण होतांना माझ्यात विचारचे काहुदर माजले.अरेऽऽऽऽऽ माझे प्रिय विद्यार्थी कोठे आहेत.तेंव्हा मला कळले की याचे मुळ कोरोना आहे.मला वाईट वाटले तरी चालेल पण माझ्या देशाचे भवितव्य असलेले विद्यार्थी कोरोना संसर्गा पासुन सुरक्षित राहिले पाहिजे.माझ्या देशात राष्ट्रीय सण-उत्सव तर अनेक वर्षी नित्याने येणारच आहेत,पण माझ्या देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी या कोरोना रोगाच्या बळी पडता कामा नये.ही माझी नैतिक भावना आहे.
दरवर्षी ध्वजवंदना दिनी माझ्या भारतमातेस स्वातंत्र्य मिळवून देण्यार्यां थोर महात्म्यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण होतांना त्याच्या त्यागमय जीवनातून अनेकांना राष्ट्रप्रेमाची जणु संजिवनी मिळते.माझा व भारत माते सहित महात्यांचा जयजयकार करतांना माझ्या साक्षीने वज्रमुठ आवळून आकाशाच्या दिशेने भिरकावतांना उपस्थितांच्या अंगात जणु दामिनी संचारते.या वर्षी प्रभातफेरी निघणारच नाही अशी चिन्ह दिसत आहेत.स्वातंत्र्य मिळाल्या पासून हा प्रसंग पहिल्यांदा पाहत असल्याने मनाला अतिव दु:खी व्हावे लागते आहे.असो माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो”जान हैं तो। जहान हैं॥ या उक्ती प्रमाणे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा जीव माझ्यासाठी व माझ्या देशासाठी लाख-लाख मोलाचा वाटतो आहे.चार-महिने संपले आहेत,आणखी जवळपास दिवाळी पर्यंत आपण स्वत:ला सांभाळा व आपल्या परिवारास सांभाळा एवढे वर्ष गेले तरी चालेल पण माझ्या देशाचे भविष्यातले आधारस्तंभ सुदृढ अन् टणटणीत राहिले पाहिजे.मला स्वाभिमानाने फडकवतांना शाळेच्या परीसरात विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद मला सर्वात जास्त भावतो!ज्या देशभक्तांनी मला हातात धरल्या नंतर मुखात वंदे मातरम् जयघोषाचा जप करत आपल्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या……..पण माझा अवमान कधीच होवू दिला नाही…..ही देशभक्ती विश्वात अग्रक्रमी आहे….त्या बलिदान वीरांना आजच्या दिनी स्मरण करतांना डोळे पानावतात……अन् त्यांचा अभिमानही वाटतो….त्यांना अभिवादन सर्व देशवासीय करतांना वातावरण देशभक्तीमय होतांना डोळे पाणावतात…अन् छाती अभिमानाने रुंद होते!
स्वातंत्र्य लढ्यात भिती गोर्यां इंग्रजांची होती आज मात्र चीनी कोरोना वायरसची धास्ती असल्याने ही परिस्थिती उद्वभली आहे.या वर्षीच्या स्वात॔त्र्य दिनी मी डवलाने फडकेलही पण कोरोनाच्या यातना विसरता येनारच नाहीत.सिमेवर रक्षण करणारे माझ्या देशाचे सैनिक व सर्व भारत देशवासीय मला तर आन, बान शान समजतात.माझ्या देशात अनेक अभियाने राबवली पण…भ्रष्टाचार मुक्ती अभियान,व्यसन मुक्ती अभियान,खोटे बोलणे मुक्त अभियान,मतदान खरेदी-विक्री मुक्त अभियान,अश्वासन मुक्ती अभियान, धनदांडगे दीनांचे शोषण मुक्त अभियान,जातियता मुक्त अभियान,कट्टर धर्मांधता मुक्ती अभियान, राष्ट्रद्रोह मुक्त अभियान,स्वार्थांध व पदांध मुक्ती अभियान या सारखी अभियाने माझ्या देशात राबवणे ही काळाची गरज आहे.येत्या भविष्यकाळात या अभियानाची माझ्या भारत देशाला आवश्यक आहेत.मला हातात घेवुन मुखात वंदेमातरम् चा जयघोष करतांना माझ्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गोर्यां इंग्रज साहेबांच्या गोळ्या छातीवर झेलुन भारत मातेस आपला प्राण अर्पण केला.त्या प्राणप्रिय स्फुर्ती गीताला सध्या विरोध होत आहे.हे माझ्यासाठी दु:ख दायक वाटते.माझ्या देशात धर्मा-धर्मात,जाती-जातीत तेढ निर्माण करणारे हे माझ्या देशाचे खरे देशद्रोही आहेत.हे खेदाने नमुद करावे वाटते.माझ्या संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार राजरोस खरेदी-विक्री होतांना माझे मन सुन्न होत आहे.माझा भारत विश्वाचा खरच सन्मानच आहे.कारण माझ्या देशाची संस्कृती पुराण,ऐतिहासिक काळा पासून आदर्श आणि प्रेरणादायी आहे.
मेरे देश की धरती।सोना उगले,उगले हिरे-मोती॥
मेरे देश की धरती………॥
या गीतातून देशाचे श्रेष्ठत्व विश्वाला प्रेरणादायी वाटते.आजच्या माझ्या ध्वजावंदनाला विद्यार्थ्यांना इच्छा असुन येता आले नाही.याचे मला दु:ख वाटते आहे….!पण कांही दिवसात कोरोनावरील लस शोधण्यासाठी नक्कीच माझ्या संशोधकांना यश मिळेलच..ही आजची उणिव प्रजासत्ताक दिनी नक्कीच भरुन निघणार?याचा माझ्या मनाला ठाम विश्वास वाटतो……भारत माता की जय!…….स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!……वंदे मातरम्..!………
जेव्हढे मांडता येईल तेव्हढे शब्दरुपाने कंधारच्या सुंदर अक्षर कार्यशाळेच्या दत्तात्रय एमेकर सरांनी मांडले आहे.माझे कोरोना काळात आलेल्या स्वातंत्र्य दिनी अतिव दु:ख आपल्या पुढे मांडलो……जयहिंद…वंदे मातरम्…..माझ्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्ञात-अज्ञात आपले प्राणपणाला लावले त्यांना आदरांजलि वाहुन….. जाता-जाता भारताचे माजी राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांच्या दु:ख निधन बद्दल त्यांना भावभिनी आदरांजलि अर्पण करुन…..थांबतो.
भारत देशाचा खरा स्वाभिमान,
स्वातंत्र संग्रामातील मर्दुमकित!
विश्वात भारत माता चमकतांना,
भारतीयांची ह्रदयालये पुलकित!
आपला
भारताची आन,बान,शान
राष्ट्रध्वज तिरंगा