अहमदपूर ;
लातुर येथील जय क्रांती महाविद्यालयाचे प्राध्यापक दशरथ केंद्रे वय वर्ष ५५ यांना काही दिवसापुर्वी कोरोना संसर्गजन्य रोगाची लागन झाली होती व गंभीर स्वरूप धारण केले होते डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ते कोरोनामुक्त झाले असुन ते सुखरूप परतले आहेत त्यामुळे केंद्रे व त्यांच्या नातेवाईकांनी फुलाबाई बनसोडे रूग्णालय लातुर येथील डॉक्टरांचे आभार मानले आहेत
याविषयी सविस्तर माहीती अशी की, सध्या महाराष्ट्र अनालॉकच्या पार्श्वभुमीवर कोरोना संसर्गजन्य रागाने थैमान घातले असुन लातुर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे परंतु रूग्ण बरे होण्याचा दर ही एक दिलासादायक बाब आहे लातुर येथील जय क्रांती महाविद्यालयाचे प्राध्यापक दशरथ केंद्रे वय वर्ष ५५ यांना काही दिवसापुर्वी थोडासा खोकला असताना 7 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली असता ते निगेटीव्ह निघाले होते आणी परत त्यांनी डॉक्टरांच्या सल्याने विविध रोगाच्या चाचण्या केल्या असता निमोनिया या रोगाचा आजार झाला आहे असे निदान लागले
त्यानंतर त्यांना मुंढे हॉस्पीटल लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तब्येतीत काही सुधारणा होताना दिसुन येत नसल्यामुळे दि 17 जुलै रोजी डॉ. राम मुंढे यांच्या सल्यानुसार पुन्हा कोरोनाची चाचणी केली असता केंद्रे हे दि 18 जुलै रोजी कोरोना पॉजेटिव्ह निघाले शासकिय रुग्णानालयात उपचार घेत असताना त्यांची परिस्थिती गंभीर होत चालली होती त्यानंतर डॉ बंकट फड यांच्या सल्यानुसार केंद्रे यांच्या नातेवाईकांनी त्यांना फुलाबाई बनसोडे या खाजगी रुग्णालयात दाखल केले
बनसोडे रूग्णालयातील डॉ.गाणु व डॉ.सुळ यांनी तात्काळ केंद्रे यांच्यावर उपचार सुरू करून कोरोना आणि निमोनिया रोगाच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण आणी नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असताना रूग्णालय प्रशासन आणी डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले व दि २९ जुलै रोजी प्रा.दशरथ केंद्रे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणुन त्यांना रुग्णालयातच ठेऊन त्यांनतर दि ०२ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात आली असल्यामुळे कोरोना मुक्त रुग्ण प्रा.दशरथ केंद्रे, दिपक इप्पर,किशोर मुंढे व नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन डॉ.बंकट फड, डॉ.गाणू,डॉ.सुळ यांचे आभार मानले. #yugsakshilive.in