कंधार ; मिर्झा जमिर बेग
दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना विधवा पत्नीस 20000/- चे एकरक्कमी अर्थसहाय्य दिले जाते त्यानुसार 8 पाञ प्रस्तावांना तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी मंजुरी देऊन त्यांना अर्थसहाय्याच्या धनादेशाचे वितरण केले गेले.यावेळी तहसीलदार सखाराम माडवगडे यांच्यामार्गदर्शनाखाली संगांयो शाखेचे प्रमुख नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार एस.व्ही.ताडेवाड संगांयो शाखेचे अजित केदार,बारकुजी मोरे नैसगिर्क आपत्ती शाखेचे उत्तम जोशी यांची उपस्थिती होती.
तसेच हात पायाने कोणत्याही प्रकारे हालचाल करू न शकलेल्या व 89% दिव्यांगत्व असलेला गोपाल बालाजी वरपडे सह 29 दिव्यांगांचे संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत मासिक अर्थसहाय्यास तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी मंजुरी दिली आहे.तसेचसामाजिक अर्थसहाय्य अंतर्गत संगायो-40, श्राबायो-25, इंगांयो-25 पाञ प्रस्तावांना तहसीलदार कंधार यांनी मंजुरी दिली असून दि.20 अॉगस्ट रोजी त्रुटीची यादी प्रसिद्ध करून त्रुटीच्या कागदपञाची पुर्तता करण्यास सात दिवसाचा कालावधी देऊन महीना अखेर संगांयो समितीचे बैठक घेतली जाणार आहे.
त्याच बरोबर विज पडुन पाळीव पशुच्या मृत्यू झालेल्या पशु पालकास प्रत्येकी 25000/- व घर जळीत प्रकरणात प्रत्येकी 5000/- चे अर्थसहाय्य नैसगिर्क आपत्ती अंतर्गत देण्यात आले ऋसल्याची माहीती बारकुजी मोरे यांनी दिली.