दिडशे वर्षाच्या गुलामगीरीतून मूक्ती

(युगसाक्षी )

सर्वांना सस्नेह नमस्कार, दिडशे वर्षाच्या गुलामगीरीतून मूक्त होवून स्वातंत्र्याची सुंदर पहाट १५ ऑगस्ट १९४७ रोजी उगवली . स्वातंत्र्याचा सुर्योदय उगवल्यामुळे समस्त देशवासीयांना अतिशय आनंद झाला . 
आपला स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्याची चळवळ अतिशय प्रेरणादायी व स्फूर्तीदायी आहे . १८५७ चा स्वातंत्र्याच्या ध्यासाने पेटून उठलेला  राष्ट्रीय उठाव , राष्ट्रीय सभेची स्थापना, जहाल व मवाळ कालखंड , टिळक युग , गांधी युग , असहकार चळवळ, चले जाव चळवळ, महात्मा गांधीनी दिलेला करा किंवा मरा हा मंत्र, गोलमेज परिषदा, घटना समितीची स्थापना , सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुढाकारातून झालेले संस्थानांचे विलीनीकरण , चंद्रशेखर भगतसिंग राजगूरू या क्रांती विरांनी दिलेले मातृभूमीसाठी बलिदान इत्यादी अनेक घटना घडामोडी स्वातंत्र्य प्राप्तीशी व स्वातंत्र्याच्या चळवळीशी निगडीत आहेत . 
अनेक शूर विर क्रांतीकारकांच्या त्यागातून व बालिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एका सशक्त बलशाली सामर्थ्यवान संपन्न भारत निर्मितीचा आपण सर्वांनी ध्यास घेवूया . 
आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया . स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा . जय हिंद जय भारत …

 वीरेंद्र गरुडकर,

#yugsakshilive.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *