जाग्रती पतसंस्थेची कार्यवाहीची नोटीस मला आली. त्यामुळे जाग्रतीस भेट देण्यासाठी ०२ आँगस्ट २१ रोजी परळीला गेलो होतो. जवळंच दै मराठवाडा साथी कार्यालय आहे. त्यामुळे तिथे जाण्याचा मोह मला आवरला नाही. मी गेलो, मी अनुभवलो आणि मी पण ‘ साथी ‘ झालो.
आम्ही १० – १५ जण कार्यकर्ते २९ जुलै रोजी पोहरादेवी – गहूलीला गेलो होतो. ती बातमी ३१ जुलैच्या अंकात प्रकाशित झाली होती. तो अंक, ती बातमी मिळावी म्हणून मी कार्यालयात गेलो होतो. पण तिथे गेल्यावर नवोदित फिचर एडिटर पद्ममाकर उखळीकर यांचा परिचय झाला. काही वेळातच संपादक सतिष बियाणी सर आले. सरांशी ती पहिलीच भेट होती. माझे नाव माहीत झाल्यावर सरांनी स्वतः उठून मला पाणी दिले आणि चहा पण सांगितला. उखळीकर, आप्पा आणि जी एस सौंदळे गुरूजींना माझा परिचय करून दिला.
परिचय करून द्यायला काही लागत नाही. पण लागतो तो शिष्टाचार ,मनाचे मोठेपण आणि संस्कार.ह्या तीनही गोष्टी प्रथम भेटीत मला अनुभवायला मिळाल्या. ३१ जुलैचा न सापडलेला अंक सरांनी मला मिळवून दिला. शिवाय गेल्या दिवाळीचा एक दिवाळी अंक दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मराठवाडा साथीचे मुख्य संपादक तथा परळी मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी संपादित आणि संकलीत ‘ विचारधन ‘ हे पुस्तक मला भेट दिले. या पुस्तक भेटीमुळे मला प्रा राजेंद्र मुळे, देगलूर आणि माजी राष्ट्रपती, मिसाईल मँन डॉ ए पी जे आब्दुल कमाल सर आठवले.मी लहानसी अपेक्षा घेऊन गेलो होतो. माझ्या पदरी मोठे दान पडले. किंबहुना ते शब्दधनंच होते माझ्यासाठी.
उखळीकर सरांसोबतच्या औपचारिक गोष्टी केंव्हा तात्विक झाल्या ते पण समजले नाही. पण त्यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जे कुणी पुरोगामी चळवळीत काम करतात ते एका अर्थाने दलित चळवळीत काम करतात.
सरांनी ‘ विचारधन ‘ हे पुस्तक देऊन माझा सत्कार केला.किंबहुना एक वाचक, एक लेखक म्हणून माझी जबाबदारी वाढवीली आहे. पुस्तक भेट देण्यामागे जसा उत्साह होता तशीच एक वैचारिक भुमिका, एक वैचारिक बैठक पण असावी. ती म्हणजे माझ्या वाचन्याच्या आणि लिखाणाच्या छंदास थोडे खतपाणी घालणे आणि माझ्या लिहत्या हाताला बळ देणे, बळकट करणे. हे काम करण्यास पण येथे पाहिजे जातीचे, ऐरागबाळ्याचे काम नोहे. महाराष्ट्र भुषण संत तुकाराम महाराजांच्या वरील उक्तीची मला आठवण झाली.
मराठवाडा साथी कार्यालयात जाण्याने माझी आणखी एक इच्छा पुर्ण झाली ती म्हणजे दि ०१ आँगस्टला प्रकाशित झालेलं कवयित्री सुनीता कोमावार – दिक्कतवार लिखित ‘ अंतरंग ‘ या कविता संग्रहाचे परिक्षण मी स्क्रीनवर वाचलं नव्हतं आणि वाचनारही नव्हतो. कारण डोळे शाबूत ठेवण्यासाठी. पण कार्यालयात तो अंक मिळाला आणि माझी इच्छा पूर्ण झाली.मी अंतरंगचे परिक्षण वाचलं. माझ्यासाठी हे पण नव्हते थोडके. त्याबद्दल धन्यवाद.
एकंदरीतच मराठवाडा साथी कार्यालयातील वातावरण , शिष्टाचार आणि संस्कार पाहून ‘ माणसाने माणसाशी माणसासम वागणे ‘ ही म्हण ओठावर आली.या वाक्याची अनुभूती आली. हे गीत गुणगुणतंच मी पदमाकर उखळीकर यांचा सत्कार केला. माझा जो सत्कार केला त्याची फोटो दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाली आणि माझा आनंद परत एकदा शतगुणीत झाला.
इतर जिल्ह्यपेक्षा बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे तेथील निर्बंध आणखी शिथिल झाले नाहीत. त्यामुळे प्रभू वैद्यनाथाचा दरवाजा बंद होता. पण मराठवाडा साथीचा दरवाजा चालू होता. किंबहूना तो माझ्यासाठी सदैव चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. इतर सहकार्याच्या घरासारखं हे कार्यालय पण माझ्यासाठी एक घरंच आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
लास्ट but not least ,शेवटी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले की ‘ विद्वान पुजते सर्वत्र ‘.शिवाय मला काहीतरी मांडता येते, माझे वैयक्तिक दुख का असेना पण ते एका शैलीत कांडता येते आणि विशेष म्हणजे इतरांना न दुखवता शब्दांच्या माध्यमातून भांडता येते.
सकाळ माध्यम समुहाने दुष्काळी वर्षांत फुलवळ येथे नदीचे रूंदीकरण, सरळीकरण आणि एक बंधारा बांधून वर्तमानपत्र सामाजिक बांधीलकी जपतात. हे लक्षात आणून दिले होते. पण दै मराठवाडा साथी या कार्यात कितीतरी अग्रेसर आहे एवढे मात्र निश्चितपणे सांगतो.
परतीच्या प्रवासात पाठीमागून ढग येत होते आणि पुढे जात होते. म्हणून एक कविता सुचली. तीची सुरुवात अशी आहे.
का तरी पावसाने
द्याव्या हुलकावण्या.
हेच कळत नाही गणित
म्हणून आम्हा शेतकऱ्यांच्या,
पदरी आहेत, अडचणी अगणित.’
प्रा भगवान आमलापुरे
फुलवळ : ९६८९०३१३२८
शं गु महाविद्यालय धर्मापुरी.
ता परळी वै.