वामनदादा कर्डक यांच्या गाण्यांनी आंबेडकरी चळवळीला चालना मिळाली – सुभाष लोखंडे

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरच्या काळात महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या काव्यातून आंबेडकरी विचारांचे क्रांती सौंदर्य अधोरेखित केले. अनेक गायकांनी वामनदादांची गाणी गायली. वामनदादांची गाणी गात आणि त्यांच्या प्रेरणेतून आपल्या काही रचना घेऊन कित्येक गायक, शाहीर चळवळीत उतरले. वामनदादांच्या गाण्यांनी आंबेडकरी चळवळीला चालना मिळाली असे मत येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांनी येथे व्यक्त केले.

महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती प्रज्ञा करुणा विहार येथे साजरी करण्यात आली. यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला साहेबराव थोरात, महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक अंकुश चित्ते तसेच महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित, साहित्यिक गंगाधर ढवळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कदम, ग्रंथ वाचक राहुल कोकरे, भगवान येवले, सतीश कांबळे, अॅड. अनिल सदावर्ते, नंदू खाडे, लखन नरवाडे यांची उपस्थिती होती. 

          आंबेडकरी चळवळीत आपल्या काव्याया माध्यमातून गीतक्रांती घडवून आणणाऱ्या वामनदादा कर्डक या महाकवीची जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ (ता. १५) झाला. याची सुरुवात नांदेडला देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारातून झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर जयंतीनिमित्त वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिमांच्या दीपपूजनानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक अंकुश चित्ते आणि क्रांतीकुमार पंडित यांनी वामनदादांची निवडक गाणी गायली. यावेळी पुढे बोलताना लोखंडे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीत गीतगायन तथा प्रबोधनाला फार महत्त्व आहे. जुन्या पिढीतील गायकांनी पायी फिरून गावोगावी गाण्यांच्या माध्यमातून घरोघरी बाबासाहेबांचा क्रांतीकारी विचार नेला. या काळातील कवी, गायक, भीमशाहिरांनी जलशांच्या, गीत गायन मंचाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठिकठिकाणी वर्षभर अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत असे ते म्हणाले. 


            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकुंतलाबाई सोनुले, शोभाबाई गोडबोले, लक्ष्मीबाई खाडे, निर्मलाबाई पंडित, गिताबाई दिपके, चौत्राबाई चींतूरे, सुमनबाई वाघमारे, आशाबाई हटकर, भिमाबाई हटकर, गोदावरीबाई लांडगे, निलाबाई हटकर, जिजाबाई खाडे, महामाया येवले, ललिताबाई कोकरे, गिरजाबाई हिंगोले, नानाबाई निखाते, भागीरथाबाई थोरात, गयाबाई नरवाडे, शोभाबाई पंडित, गुजाबाई खाडे, कांताबाई लोणी, छायाबाई थोरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील महिला पुरुष बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


—————————————————————————–

 आज १८ आॅगस्ट रोजी शहरातील डॉ. आंबेडकर नगर / जनता काॅलनी येथील बुद्धसं बुद्ध विहारात सुमेध कलामंच व ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या वतीने बुधवारी सायंकाळी ५.०० वा. हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, ललकार बाबू, पौर्णिमा कांबळे, तुषार वडने, संजय जगदंबे या कलावंतांचा भीमगीत गायनांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गंगाधर वडने, व्ही. एस. कदम, शामराव वाघमारे, एन. एम. वाघमारे, सिद्धोधन कदम, किशोर आवटे, भीमराव दवणे, शेषराव गायकवाड, भगवान वाघमारे, रंजना एंगडे, उमाताई रुंजकर, कमलाबाई हाटकर, गोदावरी सरोदे, शिला वाघमारे, मनिषा गोवंदे, अनिता आठवले, आम्रपाली ढेंबरे, सुमनबाई चावरे, भारतबाई वाघमारे आदींनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *