कंधार ; प्रतिनिधी
रायगड किल्ल्यात एक दिवस पहारा देण्यासाठी शपथ घेण्यात येत आहे. कंधार येथे गेला दोन तिन दिवसापासुन नोंदणी चालु केली असून आज रविवार दि.२९ रोजी मोठ्या प्रमाणात तरुणांनी आपल्या रक्ताने स्वाक्षरी करुन नाव नोंदणी केली आहे. तरुणांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन इचलकरंजी येथिल शिव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
इचलकरंजी येथिल शिव प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात रक्ताने स्वाक्षरी करुन नोंदणी अभियान चालवले असून
स्वराज्य संस्थापक छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचे रायगड किल्ल्यावर असणारे सिंहासन हे सुमारे ३२ मणाचे सोन्याचे करण्यात येणार आहे.याबाबत जनजागृती करुन सिंहासन पुर्ण झाल्यावर रायगडावर एक दिवस पहारा देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शिवप्रेमी तरीणांना संधी देण्यात येणार आहे.त्यासाठी नोंदणी अभियान राबविण्यात येत असून छत्रपती राजे शिवाजी महाराजां सारखे शपथ म्हणून स्वतःचे रक्ताने स्वाक्षरी करुन पहारा करण्यासाठी एक दिवस देणार असल्याची शपथ घेण्यात येत आहे.
चंद्रशेखर मोरे ,विशाल बासटवार,ॲड.गंगाप्रसाद यन्नावार,पंडीत ढगे,किरण डांगे आदीसह तरुणांनी या मोहीमेसाठी कंधार येथुन तरुणांनी पुढील पाच दिवसात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.