स्वप्नपुर्तीची फळे

शिवास्त्र : स्वप्नपुर्तीची फळे…


बुलंदीयोंके आगे जहां और भी है, अभी जीत के इम्‍तिहां और भी हैं, जिसे तुमने शिखर समझा वह अंत नहीं है, हमारी जीत के इम्‍तिहां और भी हैं… 

     
काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटतं, “आय अँम डुईंग माय लेव्हल बेस्ट” पण जगभरातील तज्ञांचं मत आहे की प्रचंड कार्यक्षम व्यक्तीने सुध्दा एकूण क्षमतेच्या फक्त २०% दिलेलं असतं, उर्वरीत ८०% क्षमता अक्षरशः अनटच्ड, अनयुज्ड राहते.       
स्पर्धेच्या युगात ‘विद्यार्थी व पालक’ हाच आत्मा मानून विद्यार्थीहित हा शिक्षक – प्रशिक्षक – शिक्षणसंस्था यांच्या कार्याचा केंद्रबिंदू ठरवणे क्रमप्राप्त झाले आहे. शिस्त हा विद्यार्थीहिताचा अविभाज्य घटक आहे. ‘एव्हरीथिंग स्टार्टस् फ्रॉम विदिन’ शिक्षकांंच्या अंगी शिस्त असेल तरच ते विद्यार्थ्यांना शिस्त लावू शकतील. आपण स्वतः पावलोपावली खोटं बोलून जगाकडून सत्याची अपेक्षा कशी करता येईल.? स्वतः एक नंबरचा कामचुकार आणि अपेक्षा करतो की माझ्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनती असावं. आपण स्वतः नीच पातळीवरचा लाचार आणि इतरांकडून मात्र समर्पित उच्चतम स्वाभिमानाची आशा बाळगतो. आपण स्वतः संधी मिळेल तिथे हात मारायचा आणि सहकारी मात्र मला अत्यंत इमानदार हवेत. जग विरोधाभासावर चालत नसतं. जग फक्त वस्तुस्थितीच स्विकारतं म्हणून ते फक्त बोलणाऱ्यांच नाही तर कार्य करणाऱ्यांचं अनुकरण करतं. जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात, “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..” (बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख – कथनी आणि करणी वेगळी असणाऱ्यांचे थोबाड बघू नये) दिलेला शब्द पाळावा कारण जयजयकार व आदर व्यक्तीचा किंवा पदाचा होत नाही तर त्याच्या गुणवत्तेचा व कामाचा होतो.        


जगाच्या बाजारात कुठेही गेला तरी आकाशाला गवसणी घालण्यासाठी आवश्यक सशक्त मेंदू-मन-मनगट-मणका-मानसिकता घडवलेला सर्वगुणसंपन्न व उच्चशिक्षित विद्यार्थी मायच्या प्रेमळ ममतेनं आणि बापाच्या करड्या शिस्तीनं शिल्पीत करण्याची जबाबदारी शिक्षक – प्रशिक्षकांना पार पाडावी लागेल. जीवघेण्या स्पर्धेच्या वैज्ञानिक युगात जग एक ग्लोबल व्हिलेज बनलंय. जागतिक स्पर्धेत पाय रोवून सन्माननाने उभा राहणारा तरुण घडवण्यासाठी कटीबध्द व्हावे लागेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुध्दा समर्पित भावनेने प्रशिक्षकांना साथ द्यावी लागेल. विद्यार्थी, पालक, शिक्षक हा नात्यांचा त्रिकोण अधिक मजबूत करावा लागेल. एकत्र रहावे, एकत्र नियोजन करावे, एकत्र स्वप्न बघावे, एकत्र काम करावे आणि एकत्रच आपल्या व पालकांच्या स्वप्नपुर्तीची गोड फळे पण चाखावी.       

इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर, नांदेड        
मास्टर कोच – जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली 

   राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद   

   [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *