बहादरपुरा येथिल नेत्ररोग तपासणी व उपचार शिबीराचे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते उदघाटन ; 200 रुग्णांना मोफत चष्मे वाटप

कंधार दिनांक 22 सप्टेंबर प्रतिनिधी

बहादरपुरा ता. कंधार येथील प्रतिष्ठित नागरिक स्वर्गवासी माधवराव पाटील पेठकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बहादरपुरा चे उपसरपंच हनुमंतराव पाटील पेठकर व लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड यांच्या वतीने नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.वर्षाताई भोसीकर,नांदेड जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दिगंबरदादा पेटकर, विश्वंभरराव मंगनाळे, कृष्णाभाऊ भोसीकर ,कुमारी राधाताई पेटकर, डॉक्टर निलेश खोडके,डॉक्टर राजकुमार पवार, हुजूर साहेब ब्लड बँकेचे संचालक माधवराव सुगावकर,प्राध्यापक माधवराव गीते सतीश देवकते, वसंतराव पाटील घोरबांड, सरपंच सौ गोदावरीबाई गायकवाड, सचिन पाटील पेठकर मनोहर पाटील पेठकर ,बालाजी तोटावड दत्तू पाटील पेठकर रामराव पाटील पेठकर,सौ कल्पना पेठकर, अवधूत पेटकर, ग्राम विकास अधिकारी परशुराम वाडीकर, माकान चन्नावार भिमराव कदम,खादर भाई, राहुल पेटकर, खरात, गेंदाजी गायकवाड,सुदर्शन पेटकर,प्राध्यापक चंद्रकांत सोनटक्के प्रवीण जोगे,विजय गायकवाड,तुळशीराम पालीमकर आदी सह गावातील नागरिक व कंधार तालुक्यातून विविध गावातून आलेले रुग्णांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.तपोरत्न प्रभु पंडिताआरार्ध्य माजलगावकर महाराज व माधवराव पांडागळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वर्गवासी माधवराव पाटील पेठकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व श्रीमती रुक्मिनबाई माधवराव पेठकर यांचा सौ. वर्षाताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या शिबिरामध्ये जवळपास 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली व 200 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व 27 रुग्णांना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.


यावेळी सचीन पेठकर ,दिगंबर पाटील पेठकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बोलताना संजय भोसीकर म्हणाले की स्व.माधवराव पाटील पेठकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हणमंतराव पाटील पेठकर यांनी हा नेत्ररोग तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करून समाजातील वयोवृद्ध वंचित नागरिकांना दृष्टी देण्याचे काम आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त करून खऱ्या अर्थाने वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली हनुमंतराव यांनी अर्पण केली तसेच माधवराव पाटील पेटकर यांचे आशीर्वाद मार्गदर्शन सदैव आमच्या पाठीशी आहेत असे संजय भोसीकर म्हणाले माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी माधवराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत एक चांगला कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल हनुमंतराव पेटकर यांची कौतुक व अभिनंदन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन माधवराव सुगावकर यांनी केले यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर परिसरातील रुग्णांची संख्या होती या सामाजिक उपक्रमाबद्दल हनुमंतराव पेटकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *