कंधार ; प्रतिनिधी
फुलवळ परिसरातील नागरिकांनी लस घेण्यासाठी
आज दि.२६ सप्टेंबर रोजी कै.दिगांबरराव पटणे सभाग्रह जुनेगावठाण फुलवळ येथे प्रा.आ. उपकेंद्रच्या वतीने कोरोनावरील कोव्हिसिल्ड लस उपलब्ध झाली असुन सकाळी 9:30 ते 1 या वेळेत हि लस देणार आहेत ज्यांनी ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या पत्नी तथा फुलवळ ग्राम पंचायत सदस्या अनिता बालाजी देवकांबळे यांनी स्वतः लस घेऊन नागरीकांनी लस घेण्याचे आवाहन केले.
लस घेण्यासाठी वेळेत येउन लस घ्यावी, येतांना आधारकार्ड, मोबाईल नंबर सोबत आनावा. अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे
तसेच 18 वर्षांच्या पुढील सर्वानी ज्यानी लस घेतली नाही अशानी पहिली लस व ज्यांची पहिली लस घेउन 84 दिवस झाले आहे अशा सर्वांनी दुसरा डोस घ्यावा तसेच गरोदर माता ,दिव्यांग बांधव,अशानी ही लस घ्यावी, लस घेतल्यामुळे कुठलाही धोका नाही लस सुरक्षित आहे, असे प्रा.आ.उपकेंद्र फुलवळ वतीने कळवण्यात आले आहे.
लस घ्या सुरक्षित रहा जास्तीत जास्त लोकानी लस घेण्यासाठी पुढे यावे असे अवाहन प्रा.आ. उपकेंद्र फुलवळ व ग्रा.प.कार्यालयाचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे व अनिता देवकांबळे यांनी केले नागरिकांना आव्हान केले.