वाडीतांड्याच्या विकास कामासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे बालाजी देवकांबळे यांनी केली निधीची मागणी

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड येथे लोहा व कंधार तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांची भेट घेऊन बालाजी देवकांबळे यांनी वाडीतांड्याच्या विकास कामासाठी निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

त्या निवेदनामध्ये वाडीत तांड्यांचा विकासा साठी निधी द्यावी असे लिहिले आहे. नंबर एक कामाचे स्वरूप महादेव तांडा ते तेतीसकेवी रोड अर्जंट मंजूरी देण्यात यावे, तसेच तांडा वस्ती प्रस्ताव दिलेला आहे त्याला मंजुरी देण्यात यावी व सोमसवाडी ते फुलवळ डांबर रोड करून देण्यात यावे. चोपनाधील पूल असे छोटे छोटे पूल मंजूर करण्यात यावे असे निवेदनात नमूद आहे .

निवेदच्या मागण्या बाबत बोलताना आमदार शिंदे यांनी तात्काळ पहिल्याप्रथम महादेव तांडाचे मेन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार. तसेच तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत असे महादेव तांडा आणि केवळ तांडा दोन्ही तड्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या यादीत घेतलेले आहेत महादेव तांडा साठी दहा लक्ष रुपये केवळा तांडा तेथे दहा लक्ष रुपये यादी पाठविण्यात आले असल्याचे सांगितले .

निवेदन देणारे कार्यकर्ते माजी सरपंच देवकांबळे बालाजी भुजंगा ग्रामपंचायत सदस्य फुलवळ व तुळशीदास रामजी रसवंते उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय फुलवळ, शिवदास पाटील सोमासे सोमासवाडी सामाजिक कार्यकर्ते, नागेश माणिकराव गोधने , गोविंद लोकांची चव्हाण, महादेव तांडा उत्तम लोकांची चव्हाण लोभाजी दिगंबर राठोड , पुंडलिक शिवराम राठोड, विष्णुदास शिवराम राठोड, हरी दिगंबर राठोड तांड्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *