शहरासह ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज – मुख्याध्यापक जी. एस. ढवळे


नांदेड – कोरोनाचा संसर्ग कायमचा संपुष्टात यावा यासाठी १८ पासून पुढील वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.‌ परंतु शहरासह ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाबाबत लोकांमध्ये अजून गैरसमज आहेत.

बाधितांची संख्या कमी झाली म्हणून निष्काळजीपणाने वागता येणार नाही. मास्क, सॅनिटाईझर, सुरक्षित अंतर, लसीकरण ही चतु:सुत्री पाळणे आवश्यक आहे. शहरातही मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी वाढली आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे असे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार घेण्यात येणाऱ्या ‘मिशन कवचकुंडल’ या विशेष मोहिमेअंतर्गत जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. ढवळे बोलताना म्हणाले.

यावेळी डॉ. शीतल नितनवरे, आरोग्यसेविका आर. एस. हातोडे, नामदेव शिखरे, अमोल शिखरे, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., पांडूरंग गच्चे, अंगणवाडी सेविका इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे, हैदर शेख आदींची उपस्थिती होती.

गतवर्षीपासून संबंध जगभरात मानवी जीवनात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कायमचे हद्दपार करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ८ ते ११ आॅक्टोबर दरम्यान राज्यशासनाने ‘कवचकुंडल मिशन’ ची घोषणा केली आहे. जिल्हा प्रशासनानेही कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी कंबर कसली आहे.

त्याचाच भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोव्हिड जनजागृती आणि लसीकरण मोहीम चालवली जात आहे. मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, अंगणवाडी कर्मचारी सुलोचना गच्चे, इंदिरा पांचाळ यांच्या पुढाकाराने गावात कोरोनापासून बचाव आणि लसीकरणाची गरज या महत्त्वाच्या बाबींवर प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर शाळापरिसरात लसीकरणास प्रारंभ झाला. 


              गावात लसीकरण मोहीमेअंतर्गत एकूण पाच टप्प्यात लसीकरण झाले आहे. १८ वयोगटापासून पुढे लसीकरणास पात्र असलेली लोकसंख्या ७३५ इतकी आहे. आत्तापर्यंत केवळ ३९% इतके लसीकरण झालेले आहे. टक्केवारीत वाढ होण्याच्या उद्देशाने लस टोचून घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर नागरिकांचे दगडगाव उपकेंद्रांतर्गत लसीकरण संपन्न झाले.

त्यात नामदेव शिखरे, अमोल शिखरे, पांडूरंग गच्चे, अश्विनी शिखरे, चाँदपाशा शेख, शेरखाँ पठाण, सरिता गच्चे, मनिषा गच्चे, विश्वदीप गोडबोले, प्रल्हाद शिखरे, उर्मिला शिखरे, प्रतिभा गोडबोले, अनिता मोरे, निलावती पांचाळ, शितल पांचाळ, माधव मठपती यांनी लस घेऊन लसीकरणास मोहिमेत सहभाग नोंदवला. नागरिकांना लसीकरण करुन घेणे अनिवार्य केले पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना काही उद्दिष्टं दिले पाहिजे. अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक कुटुंबातून डोस घेतल्याचे किंवा न घेतल्याचे सर्वेक्षण केले आहे. मात्र जनजागृतीसाठी शाळांचीही मदत घ्यावी असेही ढवळे शेवटी म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *