कंधार; सागर डोंगरजकर
कंधार शहरातील जगतुंग सागराच्या दक्षिण तटावर सुंदर असे काळ्या पाषाणात बांधलेले अष्टभुजा देवी चे मंदिर आहे ,मंदिराच्या तिन्ही बाजुने तटबंदी असून उत्तरेस जंगतून तलावाचे अथांग पाणी आहे. तटबंधीच्या आता आठ फूट उंचीच्या ओट्या वर विस्तृत मंदिर व गाभारा आहे तो सुद्धा दगडी कोरीव नक्षी काम केलेल्या दगडांचे गाभाऱ्यात पांढऱ्या गारगोटीच्या दगडाची सूंदर अशी अष्टभुजा देवीची पांढरी शुभ्र मूर्ती आहे.
त्या देवीच्या हातात खडक (तलवार)आहे म्हणून त्या देवीचे नाव खंडकि माता म्हणून प्रसिद्ध आहे.
हे मंदिर भुईकोट किल्ला च्या उभारणी पूर्वी प्रथम पूजे करीता नवव्या शतकात बांधले गेले त्या नंतर या किल्ल्याचा किल्लेदार गुलाब सिंह यांनी याचा जीर्णोद्धार केला.
आज जो पहावयास ते मंदिर त्याचे मोठे स्वरूप आहे.प्रथम मूर्ती काळ्या पाषाणातली होती नंतर ती पांढऱ्या गारगोटीच्या दगडातली स्थापित करण्यात आली.
या मंदिरात येणाऱ्या भाविकांना साठी पूर्वी धर्मशाळा, पाणपोई, आदींची व्यवस्था होती आजही आहे.मंदिराचे सुबक बांधकाम सर्वांना आकर्षित करते.तर देवीची सूंदर मूर्ती मनमोहुन घेते.
आलेला प्रत्येक भाविक दर्शन होतातच प्रसन्न भावनेने बाहेर पडतो .त्याला दर्शनाने वेगळीच अनुभूती येते.
या मंदिराचे शिखरा चे काम मंदिर ट्रष्ट चे स्व.हरींसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले हे शिखर कासवाच्या पाठीवर उभे असून त्यावरील कला कृती आकर्षित करते.
नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम निरंतर होत असतात दरवर्षी प्रमाने रक्तदान शिबिर झाले त्यात 50 दात्यांनी रक्तदान केले.
त्यासाठी परीश्रम घेतले योगिसिंह हरीसिंह ठाकुर,गुलाबराव माधवराव नळगे,शशीकांत काळे,महेश घाटे व जगदीश गिरी आदीनी परिश्रम घेतले.