माजी आमदार अविनाश घाटे व माजी जिप अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांचा भाजपला रामराम व काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड- दि. 19/10/2021

मुखेडचे माजी आमदार अविनाश मधुकरराव घाटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांनी भाजपाच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश करीत असल्याचे कळवले आहे. आज दि. 19 ऑक्टोंबर 2021 रोजी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

माजी आमदार अविनाश घाटे यांनी मी व माझे वडील कै. मधुकररावजी घाटे ज्येष्ठ नेते कै. शंकररावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयाचे नेते पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण व आमचे ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे.

भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबत आम्ही दोघेही ही भाजपात होतो. काल पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण व माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केलेल्या विनंतीला मान देवुन आम्ही आज कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत. यापुढे देखील आम्ही या दोन्ही नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दोन दिवसापुर्वीच ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आदिनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे यापूर्वी भारतीय जनता पार्टीत भास्करराव पाटील खतगावकर यांच्यावर विश्वास व्यक्त करुन जी नेतेमंडळी भाजपात दाखल झाले होते ते सर्व कॉंग्रेस मध्ये प्रवेश करतील असे वाटत असे वाटते असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे येणा-या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष एकतर्फी जिंकेल असा आशावाद माजी आ. अविनाश घाटे व श्रीराम पाटील राजूरकर यांनी आज माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी बैठकीत व्यक्त केला. यावेळी माजी आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page