कंधार : प्रतिनिधी
त्रिपुरा येथील हिंसेच्या निषेधार्थ शुक्रवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली होती त्याला समर्थन देत स्वयं स्फुर्तीने मुस्लिम समाजातील नागरीकांनी आपली दुकाने बंद ठेवून कंधार तहसील समोर दुपारी २ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करत पैगंबर हजरत मोहम्मद स.अ.साहेब यांचा अपमान, पवित्र कुराणची विटंबना, निष्पाप मुस्लिमांच्या हत्या व आर्थिक नुकसान करणारे हल्लेखोर आणि त्रिपुरा सरकारच्या विरोधात दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत कंधार तहसील चे प्रभारी तहसीलदार संतोष कामठेकर यांना रजा अकादमीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार शामसुंदर शिंदे आणि एम आय एमचे तालुकाध्यक्ष मोहम्मद हमिदोद्दिन यांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी झाले आसाम राज्यातील त्रिपुरा येथे हिंसा घडवून आणली. काही समाजकंटकांकडून तेथील स्थानिक मुस्लीम बांधवांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत. हिंसेत अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे स्थानिक मुस्लीम बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आसाम राज्य सरकारचा नाकर्तेपणामुळे स्थानिक मुस्लीम बांधवांवर अत्याचार झाले. मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे, त्यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे. हिंसेच्या आड ज्या समाजकंटकांकडून रक्ताची होळी खेळली जात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करावे. अशा मागण्यासह घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील नागरीकांनी कंधार बंद करून कंधार तहसील समोर धरणे आंदोलन करून मुस्लिम समाजातील विविध पक्षांचे पदाधिकारी व मौलवींनी आपले मनोगत व्यक्त करुन धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मौलवी शेख मगदूम, शेख मुसा, अफसर कुरेशी, हाफिज मोहम्मद सद्दाम, शेख तौसिफ, हाफिज जुबेर, सुलतान खान, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मन्नान चौधरी, जनता दलचे शेख महेमुद, माजी नगराध्यक्ष जफर खान, समीर चाउस, एम आय एम चे तालुकाध्यक्ष मोहम्मद हामेदोदिन, शेख सद्दाम, अहमद चौधरी, माजी नगरसेवक मोहम्मद हमीद सुलेमान, मिर्झा शमशोदीन सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या सह निवेदन देण्यात आले आहे.