कंधार
कंधार तालुका अभिवक्ता संघ व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कंधार येथिल कै.गणपतराव मोरे विद्यालयात कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीस मा.अतुल सलगर हे होते त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी कायद्याची माहीती देत आतापर्यंत कंधार तालुक्यातील सुमारे ११६ गावामध्ये कायदेविषयक शिबीर संपन्न झाले असल्याचे
त्यांनी सांगितले.
यावेळी महिला विषयक कायद्याचे शिबीर असल्याने या शिबीराला तालुक्यातील तिन हजार महिलांनी उपस्थिती लावली होती.
ग्रामीण भागातील नागरीकांना कायद्या विषयक माहिती नसल्याने भारत की आझादी का अमृत महोत्सव निमित्तने सर्वच्च न्यायलायाच्या आदेशानुसार प्रत्येक गावात जाऊन कायदे विषयक शिबीर घेऊन न्यायाधीस व कायदे तज्ञ मार्गदर्शन करत आहेत.
गेल्या 2आॕक्टोबर 2021 पासुन चालत असलेल्या या शिबीराला भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.