२१ व्या वर्षी सायकल वरून महाराष्ट्रभर १५ हजार किलो मिटर प्रवास करणारी यवतमाळ जिल्हयातील प्रणाली चिटके हिच्या धाडसाचे नांदेड जिल्हयात सर्वत्र कौतूक

नांदेड ; महेंद्र बोराळे

२१ व्या वर्षी सायकल वरून महाराष्ट्रभर १५ हजार किलो मिटर प्रवास करणारी यवतमाळ जिल्हयातील प्रणाली चिटके हि दि१५ नोव्हेबर रोजी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. तिचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. व तिच्या धाडसाचे कौतूकही करण्यात येत आहे.

कु. प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे
मु. पो. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ
वय-21, फोन नं. 7020740660
8788913062
शिक्षण – BSW (SRM college of social work Chandrapur )

       - Counseling Diploma course (MGAHV central university Wardha )

यशदा जलसाक्षरता विभागा अंतर्गत – प्रशिक्षित ता. वणी
पर्यावरण व जलदूत…….
उद्या रविवारी सायंकाळी सात वाजता तुमच्या गावात येत आहे, तुम्हच्या भेटीला व माझ्या अभ्यासाला……

पर्यावरण संवर्धन सायकल यात्री – कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती चा संदेश घेऊन

उद्देश – पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण जनजागृती आणि लोकल परिस्थितीचा अभ्यास.

    सभोवतालील, दिवसेंदिवस बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमानवाढ, वातावरणदल, ऋतुचक्रबदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राऊंड लेव्हल वर काम करणारी व्यक्ती यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून  माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत  चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत  मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे इ. आहे. आणि हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे.

  मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असुन, प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून, सोबत, ना कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप आहे.  माझा प्रवास स्वजबाबदारीचा  असून लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सह्योग सुद्धा लोकच करतात. प्रवास करत 11  महिन्यांपेक्षा जास्त झाले आहेत.  15,000 (हजार) कि. मी. पेक्षा जास्त चा प्रवास झाला आहे. प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय.

अशा कोविडच्या काळातसुद्धा सहकार्य मिळत आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य करीत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे.

माझ्या या सायकल प्रवासात लोकांना सांगत असलेली मुख्य 5 संदेश -ज्याचा संकल्प मी स्वतः घेतला असून, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे काळाची गरज आहे.

  1. आपल्या आरोग्यासाठी वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी, मोटारगाडीचा वापर टाळून, शक्य ती कामे सायकलने करू या.
  2. प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू यात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू या.
  3. परिसरात स्थानिक झाडे लावू या व जगवू या. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या.
  4. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू यात आणि आपले आरोग्य सुधारू या.
  5. ‘पाणी बचत व पाणी जिरवा’ या कामात सहभाग घेऊ या. या सर्व प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करू या. आणि स्वतः च्या कृतीतून संस्कार पुढे नेऊया….
    आतापर्यंतचा प्रवास मार्ग –
    ( जिल्हा – तालुका नुसार )

1) यवतमाळ मधील ता. वणी पुनवट गावापासून सुरुवात घुघूस मार्गे
( 2) चंद्रपूर वरून – वरोरा – भद्रावती – हिंगणघाट –
(3) वर्धा (ता.देवळी, ता. कारंजा, ता.आर्णी, ता. शेलू ) मार्गे केळझर –
(4) नागपूर – ता. कामठी -रामटेक – कुही – उमरखेड – नागपूर ग्रामीण – मौदा – मार्गे

(5) भंडारा – ता.लाखनी – ता. पवनी – लाखांदूर – वरून गोंदियासाठी – अर्जुनी मोरेगाव – नवेगावंबांध सडक अर्जुनी – गोरेगाव –
( 6) गोंदिया – ता. तिरोडामार्गे रामटेक, पारशिवणी – नरखेड – सावनेर – कळमेश्वर – काटोल – मार्गे अमरावती साठी – मोर्शी – वरून
(7) अमरावती -(परतवडा, चिखलदरा, धारणी) ता भातकुली – दर्यापूर – मार्गे अकोलासाठी – मूर्तिजापूर –
(8) अकोला – बार्शीटाकळी – दगडपारवा, मंगरूळपीर – मार्गे
( 9) वाशीम – रिसोड मार्गे – बुलढाण्यासाठी – लोणार – सिंदखेडराजा – हिवरा आश्रम – चिखली –
(10) बुलढाणा– खामगाव – शेगाव – जळगाव जामोद… मार्गे
खानदेश
(11) जळगाव – ता. मुक्ताईनगर- भुसावळ- जळगाव- धरणगाव – चोपडा – अंमळनेर – मार्गे
(12) धुळे ता. सिंदखेडा – साक्री(बारीपाडा) –
(13) नंदुरबार – शहादा – धडगांव – अक्कलकुवा – नवापुर –
(14) नाशिक – मालेगाव – चांदवड – निफाड – नाशिक – इगतपुरी मार्गे शहापूर पुढे
(15) पालघर – वाडा – जव्हार – मोखाडा- तलासरी – डहाणू – पालघर – विरार वसई – मार्गे
(16) ठाणे – वरून पनवेल मार्गे
(17) रायगड पनवेल – पेण – पाली – माणगाव – महाड — मंडणगड मार्गे
(18) रत्नागिरी मंडणगड – दापोली – चिपळूण – शिरगांव – रत्नागिरी
(19) सिधुदुर्ग विजयदुर्ग, देवगड, कणकवली, सावंतवाडी आंबोली घाट.

पश्चिम महाराष्ट्र
(20) कोल्हापूर ता. आजरा, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ.

(21) सांगली ता.पलूस, कवठेमहाकाळ, मिरज,

(22) सातारा ता.खटाव, वडूज, कराड, वाई, खंडाळा

(23) पुणे

(24) अहमदनगर,
मराठवाडा
(25) औरंगाबाद
(26)जालना
(27) बीड
(28) सोलापूर,
(29)उस्मानाबाद, (30) लातूर
आतापर्यंत 30 जिल्हे झाले आहे…
पुढे (31) परभणी, (32) हिंगोली, नंतर (33) अर्धापूर, नांदेड , बिलोली, धर्माबाद , नांदेड, भोकर , किनवट, माहुर व
आणि शेवट माझा गृहजिल्हा
यवतमाळ व सर्व तालुके – पुनवट गावाला प्रवास समाप्त

सायकल चालवा पर्यावरण वाचवा संदेश कृती मध्ये उतरवणारी कु.प्रणाली चिटके

यांच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *