नांदेड शहरातील मालेगाव रोड स्थित तथागत नगर परिसरातील यशवंत इन्स्टिट्यूट मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त बालकविसंमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनात बालकांनी आणि ज्येष्ठ बालकवींनी सहभाग नोंदवून चांगलीच रंगत आणली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे तर प्रमुख अतिथी कवी म्हणून ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, लक्ष्मण लिंगापुरे, निमंत्रक पांडूरंग कोकुलवार, काव्य पौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे, प्रा. यशवंत भवरे आदींची उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ नांदेड आणि यशवंत इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त बालकवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सप्तरंगी साहित्य मंडळाने हे कविसंमेलन ४८ वी काव्य पौर्णिमा म्हणून साजरी केली. यात बालक कवी शिवानी हिंगोले, हंसिका लांडगे, आरोही कांबळे, अवंती हावरगेकर, अक्षरा सोनकांबळे, मृणाल हावरगेकर, प्रणव पाटील, श्रावण कावळे, सार्थक मुंडे, मयुर नरवाडे,
सम्यक लांडगे, प्रांशू पाटील, अभिजित कावळे, श्रद्धा कावळे, शंकर स्वामी, माणिक गंगासागरे यांनी तर ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे, थोरात बंधू, नरेंद्र धोंगडे, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, गौतम कांबळे, प्रकाश ढवळे, रणजीत गोणारकर, बाबुराव पाईकराव, शंकर धोंगडे आदींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत इन्स्टिट्यूटचे प्रा. यशवंत भवरे यांनी, सूत्रसंचालन पांडूरंग कोकुलवार यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी मानले. इन्स्टिट्यूटचे सहशिक्षक श्रद्धा पाटील, दीक्षा सरोदे, ऋतुजा जाधव, निखिल कांबळे,
गंगाधर पावडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला तर लक्षवेधी अकॅडमीचे संचालक मारुती व्यवहारे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेश कांबळे, दुधमल, सुनिता कावळे, संगिता कांबळे, भीमराव भवरे, शांतीमुनी भरणे आदींनी परिश्रम घेतले.