पेट्रोल , डिझेल दरवाढीच्या चढ- उतारानंतर आता मोबाईल रिचार्ज च्या दरवाढीने जनमाणूस हैराण…

पेट्रोल , डिझेल च्या दरवाढीवर आक्रोश करणारे मोबाईल रिचार्ज दरवाढीवर मूग गिळून गप्प का ?

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

 गेली अनेक महिन्यापासून पेट्रोल , डिझेल च्या दरात कमालीची वाढ झाली असतानाच परवा त्याच भाववाढीत तोडक्या स्वरूपात कपात करण्यात आली आणि नुकतेच सर्वच मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज चे दर खूप मोठ्या प्रमाणावर वाढवले असल्याने सर्वसामान्य माणसाला या रिचार्ज दरवाढीची झळ सोसावी लागणार असून पेट्रोल , डिझेल दरवाढीच्या विरोधात आक्रोश करणारे आता मोबाईल रिचार्ज दरवाढीवर मूग गिळून गप्प का ? असा सवाल जनमानसातून ऐकायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेल च्या भावात कमालीची दरवाढ होत होती नव्हे नव्हे तर पेट्रोल आणि डिझेल ने शंभरीही पार केली. दिवसेंदिवस होत असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाला दुचाकी , चार चाकी वाहने न परवडणारे होऊन बसले असल्याने सर्वच स्तरावर या दरवाढीच्या विरोधात मोर्चे , आंदोलने करत आक्रोश करून निषेध नोंदवला गेला आणि सरकार च्या विरोधात निदर्शने करण्यात आली. परंतु काही केल्या ती दरवाढ मागे घ्यायला सरकार तयार नव्हते , तेंव्हा मात्र जनतेतून संताप व्यक्त केला जात असतानाच परवा कुठे एकदम तोडक्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल च्या त्या दरवाढीत कपात केली गेली , पण यावरही जनता समाधानी नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

पेट्रोल , डिझेल च्या दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच नुकतेच सर्वच मोबाईल कंपनीने रिचार्ज च्या दारात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे की अचानक गगनाला भिडले अशी तफावत यापूर्वी च्या रिचार्ज दरात आणि आता वाढलेल्या दरात दिसून येत आहे.

एकीकडे मोबाईल हा सर्वच स्तरातील लोकांसाठी अत्यावश्यक होऊन बसला असून मोबाईल विना दैनंदिन जीवनातील पानच हलत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याबरोबरच शोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून दैनंदिन मोबाईल डाटा जास्तीत जास्त वापरून फेसबुक , वॉट्सअप सह अन्य सुविधासाठी ही मोबाईल वापरणे हे आजघडीला एक प्रकारचे व्यसनच बनले असून झोपेतून उठल्यापासून ते झोप लागे पर्यंत पुर्णवेळ मोबाईल वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

त्यामुळे जशी पेट्रोल , डिझेल ची दरवाढ झाली असतानाही वाहने वापरण्यावर आपण निर्बंध घालू शकलो नाही तसेच मोबाईल रिचार्ज चे दर भरमसाठ वाढले असतानाही मोबाईल वापरावर निर्बंध घालू शकत नाही हे जरी खरे असले तरी ही दरवाढ कोणालाही परवडणारी नसल्याने चिंताग्रस्त नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून पेट्रोल , डिझेल च्या दरवाढीवर आक्रोश करणारे मोबाईल रिचार्ज दरवाढीवर मूग गिळून गप्प का ? असा सवाल ही जनतेतून ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *