गऊळ ; प्रतिनिधी
(शंकर तेलंग)
राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 नांदेड जळकोट वरील हे काम एका कंपनीकडे आहे. तीन वर्षापासून ही कंपनी गऊळ येथे उभी असून सुद्धा गऊळ गावाचे काम मंद गतीने चालू आहे. पण याची दखल कोणीही घेत नाही. परंतु गऊळ ग्रामपंचायत कार्यालय यांनी सदरील अधिकाऱ्याच्या पाठपुरावा करून सुद्धा तरी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अर्धवट नालीचे काम झाले आहे. आणि साईट पट्ट्या झाल्या नाहीत.
त्यामुळे सदरील गऊळाचा लोकांना त्रास होत आहे. ह्या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच 13 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार आहे. गावातील शाळा याच महामार्गावर आहे. तरीही कोणता अनुचित प्रकार घडू नये. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.50नांदेड फुलवळ , गऊळ, जाब, जळकोट या केंद्र शासनाच्या रस्त्याचे काम Epc made project अंतर्गत प्रगती आहे. पण हे कंत्राटदारांकडून पूर्ण का होत नाही . हे काम पूर्ण करण्यासाठी वरील केंद्र शासनाचा रस्त्याचे काम पूर्ण करावेत त्यासाठी उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग नांदेड यांना ग्रामपंचायत कार्यालय ने निवेदन दिले आहे.