फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महादेव मंदिरात भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे शिवशंकर ट्रस्ट महादेव मंदिर बोरी बुद्रुक च्या ट्रस्ट चे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व समस्त बोरी वासीयाकडून आयोजन करण्यात आले आहे.
आज ता. ५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शंभो महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर भागवत कथा ग्रंथाचे पूजन करून भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ करण्यात आला यावेळी सदर नामयज्ञाला खा. चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भागवताचार्य ह भ प तुकाराम मुंढे शास्त्री, खासदार तथा ट्रस्ट चे अध्यक्ष मा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी मंदिरा बाबद माहिती सांगीतली शुभेच्छा दाल्या यावेळी, जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटिल चिखलीकर यांच्या अर्धांगिनी सौ वैशालीताई चिखलीकर, भाजपा किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष बाबुराव केंद्रे,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,
भाजपा युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे,नगरपालिका उपाध्यक्ष जफर बाहोद्दिन, भाजपा युवा आघाडी तालुका सरचिटणीस बालाजी पाटील तोरणे,बिजेवाडी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम जाधव, ट्रस्ट चे सचिव बालाजी जुंबाड , देवानंद सांगवे , पत्रकार धोंडीबा बोरगावे , विश्वांभर बसवंते , होनाजी शेळगावे , व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंधार तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील जागृत महादेव देवस्थान येथे अखंड हरीनाम सप्ताह व भागवत कथेला आज ता. ५ डिसेंबर रोज रविवारपासून प्रारंभ झाला असून ता. १२ डिसेंबर रोज रविवारी सप्ताहाची सांगता होणार आहे . तेव्हा गावातील व परिसरातील भाविकांनी या भागवत कथा आणि हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
या हरिनाम सप्ताह चे दैनंदिन कार्यक्रम असे असतील. दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० गाथा पारायण, दुपारी ११ ते २ भागवत कथा, दुपारी २ ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ६ ते ८ महाप्रसाद, रात्री नऊ ते अकरा कीर्तन, तद्नंतर हरिजागर होणार आहे.
या सप्ताह निमित्त कीर्तनकार म्हणून शंकर महाराज मसलगेकर, ज्ञानोबा माऊली गुंडेवाडी कर, रोहिदास महाराज कळकेकर, मधुसूदन महाराज कापशीकर, रंगनाथ महाराज ताटे, विष्णु महाराज आंबेजोगाई, नामदेव महाराज दापकेकर, काय नाही तुकाराम शास्त्री महाराज परळी वैजनाथ आदीची उपस्थिती राहणार आहे.
बोरी सह परिसरातील सर्व गायक वादक व भजनी मंडळी सात दिवस उपस्थित राहणार आहेत.