कंधार ; प्रतिनीधी
कंधार शहरात एसबीआय एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या गार्दीमध्ये सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या व्यवहारासाठी हाल अपेष्टा होत आहेत.त्यामुळे या बॕकेत सेवानिवृत कर्मचाऱ्यासाठी वेगळे काऊंटर उघडुन विशेष सोय करण्यात यावी अशी मागणी माजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कंधार तालुक्यामध्ये एकच राष्ट्रीयीकृत एसबीआय ची शाखा आहे.या बँकेत एक लाखाहून अधिक ग्राहकांची संख्या . विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन ,संजय गांधी ,निराधार योजना ,विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांचे व्यवहार, यासह अनेक प्रकारचे ग्राहक असल्याने या बँकेवर प्रचंड मोठा ताण झाला आहे. खातेदार हे सकाळी सहापासून ते संध्याकाळी चार पर्यंत गर्दी करत आहेत.
आपल्या खातेदार हे आपल्या व्यवहारासाठी बँकेच्या समोर सकाळपासूनच रांगेत उभे असतात. यात वयस्कर व अपंग खातेदारांचे हाल-अपेष्टा होत आहे. तालुक्यातील माजी सैनिक, स्वतंत्र सैनिक, सेवानिवृत्त कर्मचारी यांची संख्या जास्त आहे. आणि त्यामध्ये बरेचसे सेवानिवृत्त कर्मचारी वयोवृध्द असल्यामुळे त्यांना रांगेतच उभे राहावे लागत आहे.
त्यांच्यासाठी बँकेमध्ये पेन्शनर साठी एक वेगळे काउंटर उघडून विशेष व्यवस्था करावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अर्जुन कांबळे,बापूराव कल्याणकर ,गोविंद सूर्यवंशी, शेख अजीज, राहुल कांबळे