माजी सैनिक बालाजी चुकलवाड covid योद्धा पुरस्काराने सन्मानित

कंधार

Covid-19 या कालखंडात मानवतेच्या दृष्टीने जे अविरतपणे सेवा केली त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांना जिविका फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने covid-19 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बालाजी चुकलवाड हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात , त्यांनी माजी आजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे . त्याच बरोबर कंधार लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत .

कोरोणा काळात पोलीस मित्र म्हणून सेवा बजावताना जनतेची सेवा त्यांनी केली. या कार्याची दखल घेवून त्यांना ऑनलाईन पद्धतीने पुणे येथून सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला .

बालाजी चुकलवाड यांच्या या पुरस्कारा यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *