नांदेड ; प्रतिनिधी
मंगळवार दि.7 डिसेंबर रात्री गाडी गाडीपुरा भागातील मशिदीतून हिंदूच्या घरावर झालेल्या दगडफेक व हिंदु तरुणांना तरुणांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करणे तसेच गाडीपुरा भागासाठी नवीन पोलीस चौकी आणि विद्युत डीपी बसविण्याची कार्यवाही 72 तासाच्या आत करण्यात यावी नसता भाजपा व इतर हिंदुत्ववादी संघटना च्या वतीने प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना दिला.
बुधवारी सकाळी प्रविण साले यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर, अशोक पाटील धनेगावकर, व्यंकटराव मोकले, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश खोमणे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी,
मंडळ अध्यक्ष मारुती वाघ मंडळ उपाध्यक्ष चक्रधर कोकाटे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप पावडे यांनी दंगलग्रस्त गाडीपुरा भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी मनपा विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत, गाडीपुरा मंडळ अध्यक्ष शीतलसिंह ठाकुर यांनी रात्री झालेल्या दंगलीची सविस्तर माहिती दिली. भाजपच्या शिष्टमंडळाने दंगलीत गंभीर जखमी झालेल्या विनीतसिंह ठाकुर, मंगेश पुरंदरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.
गाडीपुरा भागातील नागरिकांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर दिला. त्यानंतर इतवारा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. भोरे, पोलीस निरीक्षक नरवाडे यांची भेट घेऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती घेतली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात 72 तासाच्या आत खालील बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली आहे. सर्व गुन्हेगारावर 307 कलम लावून तात्काळ अटक करण्यात यावी. गाडीपुरा भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी उपाय करण्यात यावी.
हिंदू वस्तीसाठी वेगळा विद्युत डीपी बसवण्यात यावा आणि काला पुल ते मोहम्मद अली रोड हा रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करावा. योग्य ती कार्यवाही न केल्यास बहात्तर तासानंतर प्रखर आंदोलन करण्यात येईल व त्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रवीण साले, दिपकसिंह रावत, दिलीप ठाकूर, अशोक पाटील धनेगावकर, महेश खोमणे, विजय गंभीरे, व्यंकटराव मोकले, दिलीपसिंग सोडी, बजरंगसिंह ठाकुर, अनिलसिंह हजारी, शितल खांडील, वैजनाथ देशमुख, मारुती वाघ, संदीप छप्परवाल, श्रीराज चक्रवार ,चक्रधर कोकाटे, शेरसिंग भुल्लर, बबलू यादव, निखिलेश देशमुख यांच्या स्वाक्षर्या आहेत.