कंधार : धोंडीबा बोरगावे
या पुलाचे उद्घाटन धोंडिबा महादु पेठकर यांच्या समर्थ हस्ते 1977 साली झाले याच राजीव सागरात पहिले पंतप्रधान,शांतीचा दुत पंडित जवाहरलाल नेहरू यांची रक्षा कंधार येथील दिल्ली येथुन स्वातंत्र्य सैनिक स्व.अनंतरावजी मामडे साहेबांच्या अथक परिश्रमांतून आणुन तत्कालीन जि.प.अध्यक्ष श्यामरावची कदम साहेब व डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या संकल्पनेतून या राजीव सागराच्या वाहत्या प्रवाहात विसर्जीत करुन हा भाग ऐतिहासिक झाला आहे.
या घाटावरील पुलावर वर्षी परतीच्या पावसाने कहर केला.दीपावलीचा आनंदी सण हा कार्तिक मासात नसून श्रावणमासी आला,असा भास होत होता.मन्याड नदी ही पुलासमांतर पाणी आल्याने जवळ महिना सव्वा महिना झाले.केंव्हा अपघात होवू शकतो. अशी परिस्थिती निर्माण झाली, पण सार्वजनिक बांधकाम खाते कुंभकर्णी झोपेचे सोंग घेवून त्याकडे जाणुन बुजुन डोळझाक करते आहे.
त्या पुलावर असलेल्या विद्युत पोलवरील लाईट गेली कितेक वर्षापासून शोभेची वस्तू म्हणून उभे आहेत.पुलाचे कठडे कांही ठिकाणी तुटले तर कांही अज्ञाताने काढुन नेलेले दिसत आहेत.पुरात आलेल्या पुरसनावर गवत व इतर वनस्पती ही एक फुटापर्यंत वाढलेली आहे. ही परिस्थिती किती दिवसापासुन आहे. याचा अंदाज आपल्या लागेल.
त्या पुलावरून फुलवळ अंबुलगा,मुखेड, जांब,जळकोट अनेक गावांचा संपर्कासाठी या पुलावरुन प्रवाश्यांना ये-जा करावे लागते. अनेक वाहनांची रहदारी यावरुन दिवस-रात्र चालते आहे. हा पुल निर्माण करतांना माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डाॅ भाई केशवरावजी धोंडगे यांना आणि त्यांचे सहकारी माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांना खुप त्रास घ्यावा लागला.
त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरीस्टर अंतुले साहेबांनी मंजुर केला होता.पहिल्यांदा हा पुल फक्त ९ फुटांचा मंजुर झाला.पण तो मोठ्या वाहानासाठी कामाचा नव्हता त्यावेळी तो पुल वाढीव रुंदीचा व्हावा यासाठी पुन्हा आमदार भाई धोंडगे साहेब व भाई कुरुडे साहेब मुख्यमंत्री अंतुले साहेबांना भेटण्यासाठी मुंबईला गेले पण मुख्यमंत्री महोदय विश्रांतीसाठी महाबळेश्वर मुक्कामी गेले होते.तेंव्हा दोन्हीही भाई साहेब महाबळेश्वर येथे गेले त्यावेळी सायंकाळचे सहा वाजले होते.तेंव्हा दोघांनी रात्रीचा मुक्काम महाबळेश्वर येथील बसस्थानकावरएक रात्र काढावी लागली. सकाळी उठून मुख्यमंत्री महोदयांना भेटून
तो विस फुटाचा मंजुर करुन घेतला.हा इतिहास आहे.आज घडीला सार्वजनिक बांधकाम खाते या पुलावर अपघात होण्याची जणुकांही वाटच पाहते की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एखादा अपघात झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यापेक्षा अपघात होवूनये याची काळजी घेवून पुलाचा कठडा दुरुस्त करून साह्य केल्यास जीवीत हाणी टाळता येईल.
पण प्रशासन हायवेच्या पुलाची वाट पहाते की काय असे वाटते आहे. काल परवा डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या सुचने वरुन ग्रामपंचायत बहाद्दरपूरा यांनी सरपंच भाई माधवराव पेठकर यांच्या नेतृत्वाखाली तेथील गवत कापुन आपले मानवतेचे कर्तव्य पार पाडले. पण सार्वजनिक बांधकाम खाते या कडे जाणूनबूजून दुर्लक्ष करतांना झोपेचे सोंग घेते आहे.