गऊळ ; प्रतिनिधी शंकर तेलंग
कुरुळा या गावामध्ये लसी चे महत्व सांगून सुद्धा प्रतिसाद लोकांचा मिळत नाही. करोनाचा ह्या बिमारी बद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक भीती निर्माण झालेली आहे. पण हे भीती काढून टाकण्यासाठी जनजागृती तुन लोकांपर्यंत लसीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अधिकारी आपल्या गावी या मोहिमेतून गावांमध्ये जनजागृती केलेली आहे.
कुरूळ्यात मध्ये दि.8/12/2021 रोजी या तारखेपर्यंत 58 % लस झालेली आहे. कुरुळा हे गाव सर्कल असून अत्यंत कमी प्रमाणात लस झालेली आहे त्यामुळे दुर्दैवी बाब आहे. त्या अनुषंगाने गावात सर्व प्रशासन अधिकाऱ्यांचे लक्ष लागून गेला आहे.
मा. शिक्षण विस्तार अधिकारी सतीश व्यवहारे साहेब, तसेच केंद्रप्रमुख रमाकांत कांदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांनी कुळातील सर्व शाळांना बोलावून तातडीने त्यांच्याकडे घरोघरी जाऊन लस्सी बद्दल जनजागृती करून शंभर टक्के लस पूर्ण करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे.
कुरुळा या गावांमध्ये व्यवहारे साहेबांनी गाव पातळीवर लसी करण्यासाठी स्वतः मोहीम हाती घेऊन प्रत्येक शाळेतील पथके नेमून देऊन लसीकरण याचा आढावा घेतलेला आहे.आणि झालेल्या लसीकरणावर समाधान व्यक्त केले आहे.
लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जिजामाता कन्या प्राथमिक शाळा, शिवाजी प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा, तसेच सर्व अंगणवाडी आशा वर्कर सर्वांच्या वतीने कुरुळा शंभर टक्के लसीकरणाच्या मोहिमेतून ही संकल्पना घेतली आहे.