नांदेड,दि.8-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज नांदेड दौऱ्यावर असतांना महानगरपालिका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या दोन्ही ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून जुन्या कारभाराविषयी माहिती मागवून घेतली. अभ्यास करून यावर भाष्य करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.
सचिन सावंत दोन दिवसाच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. सकाळी 11. वाजता पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेस भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजुरकर, माजी पालकमंत्री डि.पी.सावंत,माजी खा.सुभाष वानखेडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, आ.मोहअण्णा हंबर्डे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बेळगे, ॲड.रामराव नाईक, प्रवक्ते संतोष पांडागळे, कोषाध्यक्ष विजय येवनकर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण व कार्यकारी संचालक अजय कदम यांनी सचिन सावंत यांच्यासह उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर सचिन सावंत यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बँकेच्या जुन्या काळातील कांही निर्णयांची माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपा अँड कंपनीने जिल्हा बँकेत मागील काळात जो प्रताप केला आहे. यासंदर्भात आपण सविस्तर माहिती घेतली असून यावर अभ्यास करून लवकरच भाष्य करू असा सुतोवाच त्यांनी यावेळी केला.
त्यानंतर सचिन सावंत यांनी महापालिकेस भेट दिली. प्रारंभी महापौर सौ. जयश्रीताई पावडे यांच्या कक्षेत आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात उपस्थिती लावल्यानंतर स्थायीसमितीच्या सभागृहात त्यांचा मनपाच्या महापौर सौ.जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, महिला व बालकल्याण सभापती संगिता पाटील डक या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी माजी पालकमंत्री डि.पी.सावंत, आ.अमरनाथ राजुरकर, माजी खा.सुभाष वानखेडे,
आ.मोहअण्णा हंबर्डे, माजी आ.वसंतराव चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी सभापती अमित तेहरा, विरेंद्रसिंग गाडीवाले, उमेश पवळे, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे,
विठ्ठल पाटील डक, निलेश पावडे, राजेश पावडे, नगरसेवक महेंद्र पिंपळे, संतोष मुळे, दिपक पाटील, उमेश चव्हाण, दयानंद वाघमारे, आदिंची उपस्थिती होती.