कंधार ; प्रतिनिधी
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या हाकेनुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा कंधार च्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या इतर मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन दि. 17 डिसेंबर रोजी करण्यात आले त्यावेळी सौ.प्रणीता देवर चिखलीकर यांनी जुनी पेन्शन योजना अंदोलनास पाठिंबा दिला.
अखिल शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी ‘एकच मिशन जूनी पेन्शन’ या घोषणेनी तहसिल परिसर दणाणून सोडला. तालुकाध्यक्ष हनमंत जोगपेटे व मुनेश शिरसीकर यांनी उपस्थितांना अंनदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
या आंदोलनास भाजपा महिला मोर्चा प्रदेशात उपाध्यक्षा तथा जिल्हा परीषद सदस्य सौ प्रणीताताई चिखलीकर,यांनी भेट देऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत मी व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब पण सोबत आहोत जिल्हा परिषद स्थरावर च्या ज्या मागण्या आहेत. त्या पुढील होनार्या बैठकीत निश्चित मांडेन पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले
यावेळी सोबत कंधार नगरपालिका उपाध्यक्ष जफर बाहोद्दीन, भाजपा शिक्षक आघाडी कंधार तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार,भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे,भाजपा शहर उपाध्यक्ष शंतनु कैलासे,नगरपालिका माजी नगराध्यक्ष प्र. चेतन भाऊ केंद्रे,भाजपा तालुका सोशलमीडीया प्रमुख अँड सागर डोंगरजकर, नगरपालिका सदस्य सुनील कांबळे , प्रभाकर कदम सर,अविनाश गीते, श्याम पाटील शिंदे ,
यांच्यासह विविध शिक्षक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठींबा दिला.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसिलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात पुढील प्रश्नांवर शासन प्रशासनाचे लक्ष वेधून ते सोडविण्याची मागणी करण्यात आली .