सत्काराचा हा क्षण ऐतिहासिक आहे ,सत्काराने मी भारावून गेलो – निवृत्ती कांबळे.


अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

अहमदपूरकरांचे प्रेम आणि हा भव्यदिव्य सत्काराचा क्षण माझ्या जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे. सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे. असे भावनिक उद्गगार सत्कारमुर्ती तथा महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निव्रतीराव कांबळे यांनी काढले.


मदत सेवाभावी संस्था, नागपुरचा ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार ‘ परवाच त्यांना मिळाला. त्याबद्दल त्यांचा भव्यदिव्य सत्कार येथील शिवछत्रपती चौकात मिथुन फँन क्लब तर्फे आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब पाटील होते तर व्यासपीठावर रा काँग्रेसचे ता अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, क्र उ बाजार समितीचे सभापती शिवानंद तात्या हेंगने, डॉ किनगावकर, काँग्रेसचे नेते सांब तात्या महाजन आणि अँड खंडाळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी टी एन कांबळे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड आणि शिवानंद तात्या हेंगने यांनी मनोगत व्यक्त केले. हावरग्याचे सरपंच ते महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष हा सत्कारमुर्तीचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला.


सत्कार मुर्ती महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निव्रतीराव कांबळे यांनी सर्व प्रथम मदत सेवाभावी संस्था नागपुरचे मनापासून आभार मानले.अहमदपूरकरांचे प्रेम आणि सत्काराचा हा भव्यदिव्य क्षण ऐतिहासिक आहे. मी भारावून गेलो आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की माझे मोठेबंधू रामक्रष्ण कांबळे हे माझे राजकीय गुरु आहेत. तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आशिर्वादरुपी पाठीवरील थापेमुळे मी आज या पदावर कार्यरत आहे, तुमच्या पुढे उभा आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, पत्रकार ,मित्रमंडळी आणि मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर भालेराव यांनी केले तर आभार अहेमद तांबोळी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *