कंधार ; दत्ताञय एमेकर
कंधार तालुक्यातील बाचोटी येथील रहिवासी भुमिपुत्र शहीद बालाजी श्रीराम डुबुकवाड १ जानेवारी २००७ मध्ये सैन दलात भर्ती झाले होते आज शनिवार १८ डिसेंबर रोजी जम्मु कश्मिरी (कुपवाड) येथे शहीद झाले असल्याने बाचोटी गावावर शोककळा पसरली आहे.
बाचोटी येथील रहिवासी बालाजी श्रीराम डुबुकवाड हे २००७ मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे प्रशिक्षण पुणे येथील कॅम्प मध्ये झाले होते. सध्या ते जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते. त्यानी सुमारे15 वर्षे सैन्यात सेवा बजावली .शहीद जवान बालाजी डुबुकवाड यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ एक बहीण, पत्नी, एक मुलगा पृथ्वीराज (वय ६वर्ष), एक मुलगी वैष्णवी(वय ८ वर्ष) असा परिवार आहे. अशी माहिती बाचोटी येथील नातेवाईकांनी दिली.
मन्याड खोर्यातील बाचोटी नगरीतील श्रीरामाचा बालाजी जम्मु-काश्मिर येथील कुपवाडा येथील सीमा सुरक्षा दलाचे शौर्यवंत जवान बालाजी श्रीराम डूबुकवाड यांचे भारत मातेचे रक्षण करतांना धारातीर्थी पडल्याने वीरमरण आले. भावपूर्ण आदरांजली.मन्याड खोर्यातील देशभक्तव सुंदरअक्षर कार्यशाळा कंधार ,💐💐💐
शहीद बालाजी श्रीराम डुबुकवाड
💐 शहीद जवान अमर रहे 💐
भारत माता की,जय…..वंदेमातरम….जयहिंद