फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील विठ्ठल-रुख्मिनी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ता. २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या नामयज्ञाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे फुलवळवासीयांकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
मिती मार्गशीर्ष वद्य ५ शके १९४३ पासून अखंडपणे येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताह दरम्यान दररोज सकाळी ४ ते ६ काकडा आरती भजन , ७ ते ९ विठ्ठल-रुख्मिनी महापूजा , १० ते १२ गाथ्यावरील भजन , सायंकाळी ४ ते ५ प्रवचन , रात्री ९ ते ११ कीर्तन आणि रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत बैठकी भजन जागर होईल.
या नामयज्ञात कीर्तनकार म्हणून तुळशीराम महाराज गिरे , संभाजी महाराज हिब्बटकर , व्यंकट महाराज एकलारकर , पंढरी महाराज मूरकुटे , अनंत महाराज हिवरेकर , कृष्णा महाराज राजूरकर , बाबू महाराज फुलवळकर , काशिनाथ महाराज नगरवाडीकर यांचे कीर्तन होणार आहेत.
ता. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ह भ प श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी साजरी करून बाबू महाराज फुलवळकर यांचे गुलालाचे कीर्तन होणार आहे . तर ता. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत काशिनाथ महाराज नगरवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.