अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या २३ व्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त येथील वाय डी वाघमारे लिखित ‘ बहुजनाला ब्राम्हण्यवादाचा धोका…..! ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि तदनंतर निमंत्रीतांच्या कविसंमेलनाचे शनिवार दि २५ डिसें २१ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
प्रकाशन सोहळ्यास उद्घघाटक म्हणून मा आ बाबासाहेब पाटील आमदार अहमदपूर – चाकूर विधानसभा ,उपस्थित राहणार आहेत. प्रा डॉ नारायण कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र समाजशास्त्र परिषद यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी प्रा डॉ सुरेश वाघमारे सुप्रसिद्ध विचारवंत लातूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याच कार्यक्रमात मा श्री बाळासाहेब जाधव माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, आणि मा निव्रतीराव कांबळे व्हा चेअरमन महेश बँक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.शब्ददान प्रकाशन नांदेडचे प्रकाशक प्रा अशोककुमार दवणे, रिपाइंचे राज्य सचिव मा बाळासाहेब कांबळे, दलित मित्र मा उत्तमराव माने, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीरंग खिल्लारे, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे आणि जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोक संस्था अहमदपूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शनिवार दि २५ डिसें २१ रोजी प्रकाशनाचा हा कार्यक्रम येथील संस्कार बौद्ध विहार, सिद्धार्थ सोसायटी येथे दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे.दरम्यान याच कार्यक्रमात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे संकलक आणि संपादक, जेष्ठ साहित्यीक तथा शब्ददान प्रकाशन नांदेडचे प्रकाशक प्रा अशोककुमार दवणे सर यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तदनंतर निमंत्रीतांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रा डॉ मारोती कसाब,विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, प्रा अनिल चवळे, प्रा भगवान आमलापुरे, माजी प्राचार्य तुकाराम हरगिले, जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, बी व्ही मुंडे, छाया बेले,कोटलवार बी पी, हिसाळाकार मुरहारी कराड, शाहीर सुभाष साबळे, शिवा कराड सर, शिवाजी नामपल्ले, सिता कुदळे, शमशोद्दीन अहेमदपुरी, बालाजी वाघमारे , सय्यद तबरेज अली ,नवोदित कवी विजय पवार आणि प्रा डॉ आर के गजलवार यांचा सहभाग असणार आहे. पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन मा अरूण हिवाळे आणि प्रा राजरत्न वाघमारे यांनी केले आहे.