नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या विद्रोही कविसंमेलनात ऐन थंडीत विद्रोही कवितांनी अंगार फुलवला. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डोंगरकडा येथील प्रसिद्ध कवी बाबुराव पाईकराव हे होते तर मंचावर उद्घाटक सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, समिती प्रमुख नागोराव डोंगरे, डॉ. मुकुंदराज पाटील, शंकर गच्चे, स्वागताध्यक्ष पांडूरंग कोकुलवार यांची उपस्थिती होती.
महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने शहरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महाराष्ट्र भूषण, जीवनगौरव, कोरोना योद्धा सेवा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने सप्तरंगी साहित्य मंडळ आणि महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात गौतम कांबळे, उषा ठाकूर, बालिका बरगळ, नरेंद्र धोंगडे, प्रकाश ढवळे, प्रज्ञाधर ढवळे, संजीव स्वामी, राहुल जोंधळे, नानाराव वाठोरे, मनोहर गायकवाड, शाहीर ललकार बाबू, स्वरलक्ष्मी लहाने, छायाताई कांबळे, रामस्वरूप मडावी, अनुष्का रायभोळे, सूनिल देवकांबळे, थोरात बंधू,आ. ग. ढवळे, चंद्रभीम हौजेकर, महेंद्र भगत, कमल कदम, आम्रपाली येरेकर, क्रांतीकुमार पंडित, भैय्यासाहेब गोडबोले, दत्ताहरी कदम आदि कवी कवयित्री यांनी एकापेक्षा एक सरस आणि दमदार कविता सादर करुन सभागृहास मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन पांडूरंग कोकुलवार यांनी केले तर कविसंमेलनाचा समारोप कवी बाबुराव पाईकराव यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा कबीर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कविसंमेलनांस प्रारंभ झाला. कविसंमेलनानंतर महात्मा कबीर समता परिषदेकडून महाराष्ट्र भूषण, नांदेड भूषण, जीवन गौरव आणि कोरोना योद्धा या पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाई गुरुनाथ कुरुडे हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय झोडपे, भीमराव घुले, अनिल मोरे, रतन वाघमारे, अनुरत्न वाघमारे, दत्ता गडलवार, हरीभाऊ भवरे, डी. एन. कांबळे, नागोराव डोंगरे, आ. ग. ढवळे, गंगाधर ढवळे, मिलिंद गायकवाड, संघपाल पाटील, चंदन घुले, जगू सरपे, सचिन बगाटे, विठ्ठल गायकवाड, डी. एन. कांबळे, डॉ. आनंद भालेराव, सुर्वे, दिनबंधू चौदंते यांनी परिश्रम घेतले.