माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे


संयमाचा आदर्श महामेरु,कलासक्त मनाने चीरतरुण नव्वदीपार व्यक्तीमत्व गुरुनाथराव कुरुडे यांना अभिष्टचिंतन! 

कंधार ; दत्ताञय एमेकर

मन्याड खोरे म्हणटले की आठवते चळवळीचे ठिकाण, या खोर्‍यात अनेक चळवळ्या डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या सोबत राहून सहभागी होवून पुर्ण केल्या.प्रत्येक लहान-सहान घटनेत डाॅ.भाई साहेबांना तोला-मोलाची साथ देणारे व्यक्तीमत्व म्हणजे माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे हे होत.आज पर्यंत ते स्वतःला मी एक कार्यकर्ता म्हणून घेतात. हा भाईंच्या मनाचा मोठेपणा दिसतो.त्यांना मन्याड खोर्‍यातील कलामहर्षि,केशवसखा,शांतीचा महामेरु, जयक्रांतिचे पाईक, दीन-दुबळयांचा आधार,सामाजिक बांधिलकी जपणारा,शिल्पकार, लाल विचार सरणी जोपासणारा अशा अनेक विशेषण शोभुन दिसतात.

कंधार शहराच्या जवळ असलेल्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीत एक नव्वदीपार चीर तरुण व्यक्तीमत्व सदानकदा जनसेवेत आपले उभे आयुष्य खर्ची केले.सावली सारखे खांद्याला खांदा लावून प्रत्येक चळवळ,शैक्षणिक कार्य, यासारख्या अनेक कार्यात सहभागी होवून विधानसभेत आमदार होवून प्रवेश, जिल्हापरिषेचे सदस्य, पंचायत समितीत सदस्य,सभापती,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधाररचे सचिव,सा.जयक्रांतिचे काम,बहुजन प्रतापने संपादक,पत्रकार,पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते,      शे.का.पक्षाचे निष्ठावंत कला महर्षी,शांतीचा महामेरु,आणीबाणीचे सत्याग्रह वीर, म्हणजे केशवसखा,सुलोचनानाथ माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांना कोरोनाची लागण झाली.पण त्याचा लढवय्य बाना अंगी असलेल्या सुभद्रा-माणिकसुत भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी लिलया मात करुन आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तींचे अजब रसायन अजब रसायन दाखवून दिले.

म्हणजे संयमानी केलेले कार्य,डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या राजकारणाचे अभियंते, दीन-दुबळ्यांना केलेली मदत,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या प्रत्येक सहकार्याच्या निरोप समरंभास आवर्जून उपस्थित राहून त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा, नित्याने योग-प्राणायामचा आभ्यास, झुंझुरक्याच चार वाजतो माॅर्निग वाॅक,वेळेच्या वेबवर जेवन,दिवसभर गरजु जनतेच्या सेवेत राहणे, सायंकाळी दत्तगडावर मोकळ्या हवेत नैसर्गिक प्राणवायूचा मनमुराद आनंद लुटून सात-साडेसातला घराकडे परतने या सर्व नियोजनबध्द जीवनशैलीत यांच्या आरोग्याचे अजब रसायन दडलेले आहे.

यांच्या सोबत सावली सारखे राहणारे निलेश गायकवाड यांच्या अथक परिश्रमातून या भयावह कोरोना आजारावर लिलया करुन सुखरुप घरी तेही पाच-सहा दिवसातच! पोहंचले.

निलेश गायकवाड हे सावली सारखे राहणारे स्वीय सहाय्यक यांनी या काळात त्यांची दवाखान्यात या बहाद्दर बौध्दाचार्यांनी रक्ताच्या नात्या सारखी काळजी घेत.या कोरोनावर मात करण्यासाठी त्यांची सेवा करुन कोरोना विषाणुवर विजय मिळविला.

आत्ता त्यांच्या कोविड प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस पुर्ण होवून दिड-दोन महिने झाली आहे

  सुश्रुषा रक्तांच्या नात्याला लाजवेल अशी सेवा करुन या कोरोनावर मात करण्यात आपला खारीचा वाटा उचलत या चीरतरुण व्यक्तीमत्वला संकटातही साथ दिली.त्यांना घरी आल्यानंतर भेट घेतली तेंव्हा त्यांनी दवाखान्यात परिस्थिती काय व कशी एकाच शब्दात वर्णन करतांना जवळपास पन्नास एक इंजेक्शन दिले असतील पार त्या कोरोनाला शरीरातून पिटाळून लावले.हा संसर्ग फार भयानक आहे.असे शब्दातून व्यक्त करतांना त्याचा आत्मविश्वास वाढलेले दिसला.

त्यांचे संयमी स्वभाव नित्याने योग अन् प्राणायाम करत असल्यामुळेच जनतेचे कर्मयोगी शिल्पकार व चित्रकार यादोन कलेचा संगम असलेले अभिजात कलावंत. क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील विठ्ठल मंदिरात गणेत्सवात समाज प्रबोधनात्मक आरास करुन आपल्या कलागूणांचा ठसा मन्याड खोर्‍यात उमटविला.

बहाद्दरपुरा येथे विठ्ठल मंदिरात दंडबैठका नित्याने करत असतांना विठ्ठल मुर्ती फोडल्याचा आळ डाॅ.भाई केशवराव व भाई गुरुनाथराव कुरुडे या दोघांवर आला.तो राजकिय सूड बुध्दीने यातून आरोपांचा खोटारडेपणा उघडकीस आला.ज्यांनी आरोप लावला होता त्यांना सरडेरांनी सत्य बोलण्यास भाग पाडले.

निजाम काळात शनिदेव मंदिरावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चित्र कोळश्यांनी हुबेहूब रेखाटले होते.त्यावेळेस रझाकारांनी त्याचित्रावर बंदुकीच्या फैरी झाडून आपला राग व्यक्त केला. आणीबाणीचा विरोध करतांना या सर्व सत्याग्रही वीरांना नाशिकच्या सेंट्रल जेल मध्ये स्थानबध्द असतांना

कारागृहाच्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर भाई झोटींगराव पाटील पहिलवान मुंढे यांचे जशाच तसे अप्रतिम व्यक्तीचित्र रेखाटले होते.ही कला पाहून कारागृह अधीक्षक महोदयांनी कलेवरती खुष होवून आपल्या मुलांना ड्राॅईंग शिकविण्याची विनंती केली.ती भाई कुरुडे साहेब यांनी मान्य केली.त्यावेळेस त्या अधीक्षकांच्या घरी डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे या दोन मित्रांना घरी घेवून गेले.

हा चमत्कार फक्त कलेमुळेच झाला.कंधार पंचातय समितीत सभापती असतांना 1972 चा दुष्काळ होता.त्यावेळी रोजगार हमी योजनेचे राज्यात सर्वात जास्त कामे या मन्याड खोर्‍यात झाले.त्या काळात बांगलादेश निर्माण झाला.त्यात विजय भारताच्या मध्यस्तीने पाक पासून बांगलादेश वेगळा झाला.त्या स्मृती प्रित्यक्ष कंधारच्या विजय गडावर भारतात एकमेव विजयी स्मारक डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून व भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या सहकार्यातून हे स्मारक आजही दिमाखात उभे आहे.

आणखी एक ऐतिहासिक कंधारच्या शिवाजी चौकात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा बसविण्यास तयार केलेल्या पुतळास्त॔भ तयार होता.ईकडे डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांनी कंधार मतदार संघाचे पहिल्यांदा प्रतिनीधीत्व करतांना ऐतिहासिक शिवाजी चौकात गनीमी काव्यातून शिवस्मारक उभारण्याचा

एक बेत करुन छ.शिवाजी महाराज तलावकट्ट्या वर असलेल्या काळेश्वर मंदिरा जवळील श्री शिवगणेश मंदिरात प्रतिष्ठाणा करण्याचे जग जाहिर केले. इकडे शिल्पकार भाई गुरुनाथराव कुरुडे हे पुतळा कोरण्यात मग्न असायचे हे फक्त दोन भाईंना माहिती.शिवगणेश मंदिरात प्रतिष्ठाणाचा दिवस उजाडला.बहाद्दरपुरा नगरीतुन मिरवणुक निघाली.

जीप गाडीमध्ये शिवप्रभुंचा अर्ध पुतळा व लागणारे साहित्य ठेवले.मिरवणूकीत  शाड होताच ही मिरवणुक मार्गस्थ झाली.

 कंधार मार्गे काळेश्वर मंदिराकडे निघाली.मिरवणुक रंगारगल्लीत येताच एका कार्यकर्यास डाॅ.भाई धोंडगे साहेब यांनी सहज सांगताच मग त्यांच्या लक्षात आले अरे आपण लिकीज कले का?मग त्या कार्यकत्यांचा हात धरला तो कंधारचा चौकात येई पर्यंत सोडलाच नाही.

तिकडे काळेश्वर मंदिरा कडे पोलिसांचा फौज फाटा तैनात.इकडे पोलिस स्टेशन कंधार जवळील चौकात दंड थोपटून भाषण सुरु झाले.त्या भाषणात जमलेल्या शिवप्रेमी जनसमुदायास डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी साद घालत एक प्रश्न उपस्थित केला.आमदार धोंडगे साहेब यांनी म्हटले.या पुतळ्याच्या आसनस्त॔भा कडे बोट दाखवून आवाहन केले.या चौथर्‍यावर छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा कसा दिसेल?म्हणताच सर्व उपस्थित शिवभक्तांनी हा चा दुजोरा देताच सोबत आणलेला छ.शिवरायांचा पुतळा जीप गाडीतून काढला तो लगेच बसवला.नंतर टाळ्यांचा कडकडाट करुन जनसमुदायाने आनंदोत्सव साजरा केला.तो अर्ध पुतळा कोरणारे उत्कृष्ट शिल्पकार म्हणजे भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब होय!

ही घटना ९ मे १९५९ रोजीची आहे.जवळपास ६२ पुर्वीची आहे.उद्या ९ रोजी मे रोजी या ऐतिहासिक घटनेचा वर्धापण दिन आहे.

अशा कितीतरी घटनेत त्यांचा सहभाग खांद्याला खांदा लावून डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब सोबत सावली सारखा आहे.त्यांच्या जीवनात कौटुंबिक आघात १९८३ वर्षी शैक्षणिक सहलीत लहान मुलगा कुमार ऊल्हास यांचा खंडाळ्या घाटात अपघात मृत्यू झाला,दुसरा आघातात पत्नी सौ.सुलोचनाताई कुरुडे या सोज्ज्वळ  व्यक्तीमत्व असलेल्या अर्धांगीचे अकस्मात डेंगु या क्रुर आजाराने त्यांच्या पासून हिरावले.

अनेक अपघात सहन करत आज नव्वदीपार व्यक्तीमत्व योग-प्राणायाम मुळे चीरतरुण आहे.त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ऊल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संस्थापक अध्यक्ष, माजी सरपंच बहाद्दरपुरा मा.दत्तात्रय गुरुनाथराव कुरुडे अन् ज्येष्ठ स्नुषा सौ.संजिवनी दत्तात्रयजी कुरुडे,नात सौ. डाॅ.शीतल मिथुन पारेकर(कुरुडे) सचिव ऊल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार व व्दितीय चिरंजीव श्री शिवाजी हायस्कूल नांदेडचे उपमुख्याध्यापक,मा.सुधीर गुरुनाथराव कुरुडे

आणि        कनिष्ठ स्नुषा डाॅ.प्रा.सौ.संगीता सुधीर कुरुडे आणि  कन्यारत्न सौ.रेखा श्रीधरराव टेकाळे(कुरुडे) आणि सौ.विजया डाॅ.सयाजीराव फुके(कुरुडे) व  नात-नातु ,स्नुषा,बंधु भाई पंढरीनाथराव कुरुडे,माजी नगराध्यक्ष कंधार नगर परिषद,माजी प्राध्यापक वैजनाथराव कुरुडे,दिवंगत प्रल्हादराव कुरुडे बंधु असा परिवार आहे.निराळी समाजातील ह.भ.प. महादुजी कुरुडे विणकर समाजातील यांच्या परिवारात माणिकराव पिता व माता सुभद्राई यांच्या उदरी 28 डिसेंबर 1929 रोजी जन्मास आलेले गुरुनाथरत्न समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आपली समाजसेवा पोहंचवली.

त्यांनी कलेची जोपासत असतांना अनेक शिल्प घडविली.कंधार शहरात माजी नगराध्यक्ष दिवंगत बाळासाहेब पाटील लूंगारे साहेब यांच्या घरी काढलेला छ.शिवरायांचे तैलचित्र अनेकांना मोहित केले.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेची मातृशाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांच्याकडून झाले.

त्यांची धर्मपत्नी अधिश्वरीचे काय वर्णन करावे. मी अगदी जवळून पाहिले आहे.आठवड्यातून तीन-चार दिवस माझ्या आई कुसुमबाई यांना बोलण्यासाठी येत असत.त्याकाळी माझी कला बहरात होती.माझी कलाकृती पाहून नवल व्यक्त करुन आठ-पंधरा दिवसांनी आठवून नवल करत.आमदार सौभाग्यवती असून सुध्दा माझ्या घरी कधी खुर्चीवर बसल्या नाहीत.

तो आमदार पतीराज आसल्याचा कधी आव वागण्यात येवू दिला नाही.त्यांचे नातू विशाल आणि नितीन मोठी आई आहेत का?म्हणून येत.त्यांना माहित असत की पापन्नाच्या घरी नक्कीच असतील असे त्यांना वाटायचे.त्यांचा चेहरा महालक्ष्मी मुखवट्या सारखाच वाटायचा..!वागण्यात सोज्वळ पणा

होता.माझा मुलगा दृष्टांत व कन्या दृष्टी ही दोनही अपत्य त्यांच्या मांडीवर खेळले.त्यांच्या टाळू त्यांनी कोमल हाताने माखल्या आहेत.शेवटी कंधार शहरातून नांदडेला दवाखान्यात जातांना देखील माझ्या मुलीचे पापे घेवून गेल्या हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर  आजही जीवंत वाटतो.

त्यांचे आनखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील कोणत्याही शाखेतील सेवका पासून ते प्राचार्य पर्यंत कोणताही सहकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत असतांना त्यांनी तो निरोप समारंभ आवर्जून उपस्थित राहून त्याच्यावर स्तूती शब्दसुमने उधळून त्यांनी संस्थेत केलेल्या कामाची पावती देणे त्यांना फार आवडीचे.

कारण संस्थेचे सचिव या अधिकारी नात्याने त्यांचे निरोप समारंभातील भाषणाने सत्कार मुर्तीचे डोळे पाणावतात.वातावरण भावूक होवून जाते.प्रत्येकांच्या संस्थेतील अडी-अडचणी सोडविण्यास प्रामाणिक प्रयत्न करतात.

माझ्या कलेचे उर्जास्त्रोत माझ्या कलेवर कौतुक करुन शाबाशी देतात.

माझ्या कल्पकतेला दाद देवून माझा उत्साह व्दिगुणीत करतात.माझ्या खंदारी वात्रटिका पाहून ग्राम पंचायत कार्यलयाच्या वतीने माझा सत्कार केला.वात्रटिका साहित्य प्रकार अवघड असते.ते माझ्या गावच्या कलावंतानी हे आत्मसात केला.

गोष्ट कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार काढले.कलेचे दर्दी व्यक्तीमत्व मला कलेत आदर्शस्थानी आहे.मला श्री शिवाजी विद्यालय बारुळ या ज्ञानालयातील सेवा करण्यारंभी मदत केली.आर्थिक मदतही केली.

आज पर्यंत त्यांनी अनेक पर्यटना क्षेत्र पाहण्याचे दौरे केले.

अनेक स्थळांना भेट दिलेल्या आहेत उदा दक्षिण भारतातील धर्मक्षेत्र पाहिले .श्रीशैलम् मल्लिकार्जुन क्षेत्र .तिरुपती बालाजी मंदिर ,मदुराईचे मिनाक्षी मंदिर, रामेश्वरम चे कन्याकुमारी विवेकानंद स्मारक, म्हैसूर श्रीरंग पटनम वृंद्धावन गार्डन ,तिरुअनंतपुरम, श्रवण बेळगोळ चे बाहुबली मंदिर ,तंजावर जिंजीचा किल्ला, तसेच पूर्वेकडील जगन्नाथ पुरी ,भुवनेश्वर ,कोणार्कचे सूर्यमंदिर ,तसेच मध्य भारतातील अजंठा व वेरूळच्या लेण्या नागपूर रामटेक ,काशी सारनाथ अलाहाबाद, बुद्ध गया, हिंदू गया उत्तरेतील दिल्ली, हरिद्वार ऋषिकेश ,आयोध्या खजुराहो, झांसी ,आग्रा, फत्तेपूर शिकारी सांची का स्तूप ,मथुरा वृंदावन गोकुळ भाकरा नांगल धरण कुरुक्षेत्र जयपुर चंदिगड आधी अनेक कला क्षेत्रे तीर्थक्षेत्रे हे दर्शन घेतलेले आहे.

भाई साहेब स्वतः कलावंत असल्यामुळे त्यांना सहलीतून आनंद अन् आभ्यास या दोन्हीही गोष्टी साध्य करता येतात.

दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे काही कर्मचाऱ्या ही सहवास राहील  हे ठरवून पश्चिम उत्तर भारतात प्रवास करण्याचे ठरवले. आठ दहा दिवसाचा दौऱ्याचा कार्यक्रम ठरविला तरी मी स्वतःच्या गाडीत त्यांचे बंधू प्रा. वैजनाथजी कुरूडे  डिघोळ चे भावजी मदनराव पारेकर माझे स्वीय सहाय्यकनिलेश अशोकराव गायकवाड (बौध्दाचार्य) गाडीचे सारथी युवराज लुंगारे या पाच जणांसह ठरविले,

ही माहिती आमच्या काही कर्मचारी मित्रांना घेऊन नांदेड शाळेचे अधीक्षक सूर्यकांत कावळे यांनी सोबत काही शिक्षक व प्राध्यापका सह सहल ठरवून सोबतीस कांही सहकारी लागतात. असा मनोदय व्यक्त करून आखणी केली.भाईंचे वर 85 वर्षाचे चीरतरुण अनेक व्याधी नि ग्रस्त त्यामुळे जेवढे सहकारी असतील तेव्हढे उत्तमच!असा प्रवास राजकारण राहून वेळ काढून नेत्रांचे पारणे फिटले.

ज्यावेळी नोटा बंदी झाली.त्यावेळी त्यांचा पर्यटनाचा दौरा सुरु होता.एटीएम च्या मदतीने या अडचणीत देखील व्यवस्थित दौरा केला.आजही त्यांची इच्छाशक्ती गगनाला गवसणी घालणारी आहे.या धिरोदात्त ईच्छाशक्तीच्या जोरावर नव्वदीपार चीरतरुण जीवन जगत आहेत. 

या वर्षी पण “स्टॅच्यू ऑफ युनिटी” हा विशालकाय पुतळा पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विश्वस्तरावर मोठ्या पुतळ्या सहित अनेक पर्यटन केंद्रांना भेट देत आभ्यास दौरा पुर्ण केले.

आज त्यांचा 91 वा वाढदिवसानिमित्त भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांना दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *