दिनांक 29/11/2021 रोजी गोदावरी महामंडळा कडून नांदेड जिल्हयातील प्रस्तावित 40 सिंचन प्रकल्पासाठी (4.796T.m.c.) पाणी उपलब्ध मा. जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे सुचनेनूसार तत्वतः मान्यता दिली आहे. आमदार मोहदयानी लगेच 2000 हजार कोटी निधी, 55 हजार एकर जमीन सिंचन व 24 तलावास मंजूरी असे जाहीर करुन टाकले. खरे तर जिल्हयातील (वॉटर अॅलोकेशन) पाणी उपलब्ध पहाता लोहा-कंधार साठी (2 T.m.c.) येईलत्याचा हिशोब काढल्यास 3000 हेक्टर शेती सिंचन होउ शकते त्यानी 55000 एकर हा आकडा कसा काढला कळत नाही.
आणी दूसरी बाब म्हणजे कोणताही प्रकल्पाचे सर्वेक्षण अंदाजपत्रके, भुसंपादन, तांत्रीक मान्यता, वैयक्तीक पाणी उपलब्धता नसताना निधी 2000 कोटी निधी मंजूर झाला हा जावाई शोध कसा लावला हे ही कळत नाही. मग प्रशासनातील आमदाराचा मागील अनूभव फक्त मॅचींग फिक्सींग करुन मलीदा लाटण्याचाच आहे का ? किंवा जनतेला मुर्ख बनविण्याचा आहे. या दोन्ही पैकी एक नक्की आहे.
लोहा – कंधार तालूक्यात एकूण लहान – मोठ्या (पाझर – साठवण) 168 साईड आहेत मागील 30 वर्षा पासुन त्या त्या विभागाकडे प्रस्तावीत आहेत. आमचीही इच्छा या भागात जास्तीत जास्त तलाव व्हावेत व शेती सिंचन खाली यावी असी आहे तसी सुरवात ही आम्ही केली होती. पण आताचा जो प्रकार पहाता मागील आडीच वर्षात या भागात सर्व विभाग निरंक असुन सगळीकडे आनागोंदी आसुन विकासा बाबतीत अधिकारी व लोकप्रतिनीधी मनमानी व समन्वय नसत्याचे दिसते. या आमदाराच्या बाबतीत तर मतदार असी चर्चा करताना एकायला येते की,
आम्ही पैशापाई हे आंधळ आंगावर घेतलं आहे. माझी याबाबत बोलायची इच्छा नव्हती पण कांही गांवातून फोन येत होते की, ही वरील बाब खरी आहे काय ? एक कार्यकर्ता म्हणून मी हा खूलासा केला आहे. जो पर्यंत एखाद्या प्रकल्पाला तांत्रीक मान्यते सहीत (प्र.मा.) प्रशासकीय मान्यतेचा शासनाचे (G.R.) पत्र निघत नाही तोपर्यंत मंजूरी म्हणता येत नाही. किमान एवढे समजण्याइतके तरी आमदार महोदय कळते असतील असे वाटते.
विकास कामे व जनतेचे दैनदिन जिल्हाळ्याच्या प्रश्नाची सोडवणूक होत नसेल तर किमान दिशाभुल करु नका एवढी माफक अपेक्षा.
यावेळी दत्ता पवार , मनोहर पाटील भोसीकर ,शिवदास धर्मापुरीकर ,दिलीपदादा धोंडगे , संजय पाटील कराळे ,अँड.विजय धोंडगे , शिवराज पाटील धोंडगे , शरद भागानगरे , भरत चिखलीकर , माधवराव मोरे , अनिल मोरे , मन्मथ कल्याणकर ,सुरेश शिरसे आदीची यावेळी उपस्थिती होती .