अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
तालुक्यातील मौजे पार – यस्तार येथील शिक्षक कवी ‘ हिसाळाकार ‘ मुरहारी कराड यांच्या ‘ चांदोबाच्या घरी ‘ या बालकवीता संग्रहाचे आ
दि १८ जाने २२ रोजी मुंबईत आँनलाईन प्रकाशन होणार आहे.
डॉ निशिगंधा वाड एज्युकेशन्स अँण्ड कल्चरल ट्रस्ट, वाचू आनंदे उपक्रमाअंतर्गत भव्य आँनलाईन प्रकाशन सोहळा. ‘ वाचू आनंदे ‘ उपक्रमाअंतर्गत जेष्ठ बालसाहित्यीका डॉ विजया वाड यांचा ७७ वा वाढदिवस आणि नववर्ष स्वागत औचित्यपूर्ण दिनी राज्यस्तरीय ११ प्रकाशक आणि १११ बालसाहित्यीक यांच्या समवेत बालकांसाठी १११ बालसाहित्यीचा भव्यदिव्य आँनलाईन प्रकाशन सोहळा मुंबईत आज मंगळवारी दि १८ जाने २२ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक पुनम राणे, विश्वनाथ खंदारे आणि मनिषा कदम यांनी दिली आहे.
या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ विजया वाड, संस्थापक डॉ निशिगंधा वाड या राहणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते हिसाळाकार मुरहारी कराड यांच्या ' चांदोबाच्या घरी ' या बालकवीता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
यावेळी श्री सुक्रत खांडेकर,श्री प्रवीण दवणे, श्रीमती माधवी घारपुरे, माधवी कुंटे, डॉ सम्रद्धी म्हात्रे – चिराटे, प्राचार्य ,संदेश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी श्री अरूण म्हात्रे आणि श्री एकनाथ आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दुपारी ०३ : ३० वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन अरूण म्हात्रे आणि दिपाली केळकर करणार आहेत. ' चांदोबाच्या घरी ' हा शिक्षक कवी ' हिसाळाकार ' मुरहारी कराड लिखित बालकवीता संग्रह गुरूमाऊली प्रकाशन उदगीर, चे प्रकाशक प्रा रामदास केदार यांनी प्रकाशनासाठी सज्ज केला आहे.
मुरहारी कराड यांच्या या यशाबद्दल श्री ज्ञानोबा भोसले,श्री एन डी राठोड, कवी राजेसाहेब कदम, प्रा अनिल चवळे, वाय डी वाघमारे गुरुजी, प्रा ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी नामपल्ले, बाळासाहेब कराड, बिंधास्त बालाजी मुंडे, प्राचार्य तुकाराम हरगिले, प्रा रामदास केदार, सिद्देश्वर मुंडे, प्रा डॉ मारोती कसाब, कवी शिवा कराड, अंबादास केदार, प्रा अनिल मुंडे, प्रा डॉ सतिष ससाणे, प्रा डॉ आर के गजलवार, नवोदित आणि नवतरुण कवी विजय पवार आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.