फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील बारूळ माणार प्रकल्प हा १९६२ साली उभारण्यात तेंव्हा फुलवळ गाव या मन्याड धरणात संपादीत करण्यात आले आहे. त्यावेळी मूळ गावचे पुर्नवसन झाले , तेंव्हा येथे नविन वसाहत निर्माण केली येथे जुन्या गावातील बहुतांश कुटुंबांनी नविन वसाहतीत घरे बांधली यातील काही कुटुंबांना नवीन प्लॉट मिळाले नसल्याने ते जुने गावठाण मध्येच राहत आपली घरे सोडली नसल्याने या लोकाना शासकिय कामासाठी घराचा नमुना नं आठ चा उतारा देण्यासाठी गावाचे पुर्नवसन झाले असल्यामुळे येथे ग्रा.प. ला येनारे प्रत्येक ग्रामविकास अधिकारी हे आम्हाला देता येत नाही असे सांगून टाळाटाळ करत होते . पण नुकतेच शासकीय कामांसाठी जुनेगावठाण फुलवळ हे भोगवट्या मध्ये घेण्याचे आदेश शासनाने फुलवळ ग्राम पंचायत ला दिले आहेत.
पुनर्वसन झाल्यामुळे येथे कोणत्याही शासकीय कामासाठी प्रत्येकाला च अडचण निमार्ण होत होती. त्यामुळे २२ नोव्हेंबर २०१७ रोजी धोंडीबा बोरगावे यांनी रितसर ग्राम पंचायत ला निवेदन देऊन जुने गावठाण ची फेर आकारणी करून नमुना नं ८ चा नवीन उतारा तयार करून जनतेची होत असलेली हेळसांड थांबवावी अशी विनंती केली होती , त्यावेळी ता. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळ दैनिकात तशी बातमी ही प्रकाशित करण्यात आली होती . त्यावरून फुलवळ ग्राम पंचायत ने केलेल्या पाठपुराव्याला शासन दरबारी यश आले असून शासकीय कामांसाठी भोगवाट्यात उल्लेख करून नमुना नं आठ तयार करावा असा आदेश ग्राम पंचायत ला मिळाल्याने ग्रामस्थांतुन आनंद व्यक्त केला जात आहे.
नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी जिल्हात प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबऊन शासनाच्या विविध योजनाची माहीती सर्वाना मिळावी यासाठी हा उपक्रम फुलवळ येथे ४ जानेवारी रोजी आयोजीत केला होता . या मध्ये पंधरा विभाग सामील झाले होते यामध्ये ग्रा.प.च्या वतीने येथील जुनेगावठाण शासकिय योजनेसाठी भोगवट्या मध्ये घेण्यासाठी प्रशासन आपल्या गावी आले असता उपविभागीय अधिकारी डाॅ.शरद मंडलिक यांना ग्रा.प.च्या वतीने विनंती अर्ज दिला होता हा अर्ज निकाली काढुन जुनेगावठाण हे शासकिय कामासाठी भोगवट्या मध्ये घेण्याचे आदेश ग्रा.प. कार्यालय ला दिले असुन आता जुनेगावठाण मधील शासकिय कामासाठी लागणाऱ्या नमुना नंबर आठ हा उपल्बध होण्यासाठी आता कसलीच अडचन येनार नसल्याचे सरपंच विमलबाई मंगनाळे यांनी सांगितले.