भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव , ” काव्यधन ” गौरवग्रंथ प्रकाशनासाठी सज्ज.

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रतमहोत्सवा निमित्ताने शब्ददान प्रकाशन, नांदेड तर्फे” भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव काव्यधन गौरवग्रंथ प्रकाशित केला असून आहे. या ऐतिहासिक काव्यधन गौरवग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे.

   अधिक माहिती असी की, नांदेड येथील प्रयोगशील प्रकाशक, प्रसिध्द लेखक तथा साक्षेपी संपादक शब्ददान प्रकाशनचे संचालक प्रा अशोककुमार दवणे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रतमहोत्सवी वर्षा - निमित्ताने " भारतीय स्वातंत्र्याचा अम्रतमहोत्सव काव्यधन गौरवग्रंथ " संपादीत केला आहे..


    भारताच्या स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव सर्वत्र साजरा होत असतांना कवींचा यात वाटा असणे खूपच महत्त्वाचे आहे. या एकाच उदात्त हेतूने, भारताचा गौरव करणारी कविता, भारतीय संविधानाचा गौरव करणारी कविता, हुतात्म्यांचा गौरव करणारी कविता, बलिदान दिलेल्या योद्धांवर कविता, सैनिकावर कविता, युद्धावर कविता, लढवय्या महान महिलांवर कविता, महात्मा गांधी यांच्या योगदानावर कविता आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर कविता मागविण्यात आल्या होत्या. यास भरघोस प्रतिसाद मिळाला.


       या  काव्यधन  ११८   प्रस्थापित आणि नवोदित कवींचा समावेश आहे.
   दरम्यान , " भारतीय स्वातंत्र्याचा अम्रतमहोत्सव काव्यधन गौरवग्रंथामध्ये अहमदपूर येथील जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, नवतरुण कवी विजय पवार आणि प्रा भगवान आमलापुरे यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल या कविंचे कला आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

फक्त १२ दिवसात
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्व काव्यधन गौरवग्रंथ
छापून तयार. समावेश असणार्या सर्वच कविंना पोष्टपार्सलने घरपोच मिळणार आहे.

प्रा अशोककुमार दवणे
नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *