श्री संत माणिक प्रभू महाराजांच्या 150 व्या सुवर्ण महोत्सवाच्या पुण्यतिथी निमित्ताने ह.भ.प. श्री विठ्ठल महाराज आंबुलगेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता आणि महाप्रसादाचा लाभ

कंधार/ गऊळ


शंकर तेलंग

कंधार तालुक्यातील आंबुलगा या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत माणिक प्रभू महाराजांची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते या यात्रेला श्री संत माणिक महाराजांच्या दर्शनाला फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.


अंबुलगा पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील अनेक खेडी तांडे, वस्ती ,वस्त्या ,वाड्या गावे, जोडलेली नाळ आणि दीडशे वर्षापासून ही चालत आलेली यात्रा श्री संत माणिक प्रभू महाराजांचा चमत्कार आहे.नवसाला पावणारा आणि भक्तांना आशीर्वाद मिळत असतो. प्रत्येक व्यक्ती हा ता नौकरी, शेतकरी, व्यापारी हे बाहेर गावी असो ते नक्की यात्रेला येणारच हे ठरलं.
श्री संत माणिक महाराज हे मूळचे हंडीखेर कर्नाटक येथून अंबुलगा नगरीमध्ये पदार्पण केले. भक्तिमार्गाने पांडुरंगाचे भक्त असून पंढरीचे वारकरी होते. महिन्याची पंढरीची वारी करणारे संत होते.
अशा ह्या संत महापुरुषांनी अंबुलगा नगरीमध्ये हे विसर्जन झाले. तेव्हापासून ही गोष्ट दीडशे वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली यात्रा आज पर्यंत तागायत आहे. अंबुलगा गाव हे तीर्थक्षेत्र दर्जा आहे.

       सुवर्णमहोत्सवाच्या पुण्यतिथी निमित्ताने ह.भ.प श्री विठ्ठल महाराज  आंबुलगेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तांना अभंगातून "गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. लेखा बाळकृष्णा नंदा घरी आनंदल्या नर नारी "  

या अभंगातून भक्तांना भगवान श्रीकृष्ण परमात्म गोकुळात अवतार घेतला आणि भक्तांचे संरक्षण केलं. दुष्ट लोकांच्या राक्षसांचा संवार केला. या अभंगातून समाज प्रबोधन महाराजांनी केले. यावेळेस अंबुलगा पंचक्रोशीतील अनेक लोक महिला पुरुष भक्त किर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *