राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती वेळा घेणार मोजमापच , गावकऱ्यांतुन संताप ?..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
नांदेड ते उस्माननगर - फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे फुलवळ येथे अर्धवट काम करून संबंधित मे. कलथीया एजन्सी गायब झाली की काय ? असा सवाल प्रत्येकाला च पडला होता. सदर रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच उर्वरित अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे अशी वेळोवेळी मागणीही केली जात होती . आज अखेर तो दिवस उजाडला आणि ता. २७ जानेवारी रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्या शिल्लक राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे मोजमाप घेतले खरे परंतु आजही राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी आणखी असेच किती वेळा मोजमापच घेणार याबद्दल गावकऱ्यांतुन संतापच व्यक्त केला जात होता.
सदर रासत्ताचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण व विद्युत डेपो हटवून काम पूर्ण करण्यास सहकार्य करावे असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने ग्राम पंचायत ला पत्र व्यवहार करून केवळ पळवाट काढली होती . आणि संबंधित विभाग केवळ झोपेचं सोंग घेत त्या कलथीया एजन्सीची पाठराखण करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. परंतु ग्रामस्थांच्या व प्रवाशांच्या वेळोवेळी भावना जाणुन घेत आणि रस्त्यावर होत असलेले नियमित चे छोटे मोठे अपघात पाहून दै. सकाळ ने बातम्यांच्या माध्यमातून सदर प्रश्न नेहमीच लावून धरला होता .
फुलवळ बस स्थानक शेजारी जांब व मुखेड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाय पॉईंट तयार झाला असून त्या ठिकाणचे वळण हे अत्यंत धोकादायक बनले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढत असून कधी कोणाचा जीव जाईल हे सांगणे जरी कठीण असले तरी वाढत्या वाहतुकीचा विचार करता सावधानता बाळगणे ही तेवढेच महत्त्वाचे असल्याने प्रशासन व संबंधित ठेकेदार ला जागे करत अखेर सदर अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायत ने वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला . आणि यासंदर्भात वारंवार बातम्या प्रकाशित करून प्रशासन व ठेकेदार यांना वेठीस धरण्यात प्रसार माध्यमाचा मोठा वाटा असल्याच्या भावना जनमाणसातून ऐकायला मिळत होत्या .
केंद्रशासनाच्या या रस्त्याचे काम आता नक्कीच चालू होणार असून या रस्त्याची रुंदी १०० फूट असून सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ते व आर सी सी नाली सुद्धा दोन्ही बाजुंनी करणे अनिवार्य असल्याचे सांगून आज रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी आज फुलवळ येथील उर्वरित रस्त्याचे मोजमाप घेतले त्यावेळी फुलवळ ग्राम पंचायत चे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.