नांदेड ; प्रतिनिधी
- जिल्हा स्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन… जवाहरलाल नेहरू मा.व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा व नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी, खो-खो, हाॅलीबाॅल,धावणे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात संयुक्त संघात तालुका व जिल्हा स्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय मिळून एकूण 10 ते 15 पुरस्कार वितरित करण्यात आले.
हाॅलीबाॅल, कबड्डी व खो-खो या तिनही स्पर्धेत ज.ने. विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला व जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले. ‘धावने’ या स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिनही गटात विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात ज.ने. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लोकगीत, पोवाडा,लावणी व लोकनृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पारीतोषिक वितरण करण्यात आले. यात मेडल व पदके मिळून जवळपास 70 ते 80 बक्षिसे विद्यार्थ्यांना देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बडुरे सर प्रमुख अतिथी श्रीमती चंदा रावळकर सौ. छायाताई धर्माधिकारी, प्रा. शिंदे सर, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी उपस्थित होते.
यात रावळकर मॅडमने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पंच इत्यादींचा सत्कार केले. या सामन्यांचे पंच श्री कैलास पवार, श्री कंडापल्ले सर, प्रा. मुदखेडे सर, श्री भुसलवाड सर यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. भुसावळे सर सौ. शिराळे मॅडम, विद्या मंगनाळे मॅडम, प्रा. सौ. मेलकेवाड मॅडम, सौ. देशमुख मॅडम, सौ. नेरलेवाड मॅडम, सौ.कुरे मॅडम आदींनी परिश्रम घेतले.
परिक्षक म्हणून प्रा. सोळंके सर, श्री फड सर व भुसलवाड सर यांनी काम केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन.टी. तिप्पलवाड सर, प्रा. शिवाजी हंबर्डे यांनी केले तर आभार श्री. संतोष पचलिंग सर यांनी केले