कंधार ; ता. प्र.
दरम्यान शिवदिक्षा कार्यक्रमदि. ०७.०२.२०२२ रोजी सोमवारी श्री प.ग्र.१०८ डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे हस्ते शिवदिक्षा सोहळा संपन्न होणार आहे.कार्यक्रमाची रूपरेषा मध्ये शिवपाठ दररोज सकाळी ५ ते ६ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे.
अन्नदाते गोविंद शंकर स्वामी ,सुभाष बापुराव , रामदयाळ पंकटसिंह ठाकूर , गंगाधर निवृत्ती केंद्रे , उमाकांत विश्वनाथ कोडे ,माधव शेषेराव मोरे , बालाजी पांडुरंग लालगे यांनी अन्नदान केले आहेदररोज सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शि.भ.प.बाबुराव महाराज करंजीकर कथाकार वदि.१०.०२.२०२२ रोजी रात्री शि.भ.प.बाबुराव महाराज करंजीकर यांचे किर्तन होणार आहे.शि.म.प.जनार्धन महाराज बेदीवार ,संगीत संच शि.म.प.जनार्धन महाराज बेदीवार शिनभोगी यांचा राहणार आहे सदरील कार्यक्रमामधे कोरोना नियमांचे पालन करण्यात येत आहे.
तरी भाविकांनी सहकार्य करावे. अशी विनंती समस्त मौ. पांगरा गावकरी वगावातील गोविंदराव पाटील , माधवराव टेकाळे , नारायण रूंजे ,विजय लालमे , कल्यान बेंद्रे , बळी भेरे ,केरबा गजेवाड , उमाकांत स्वामी , सुंदर सिंग ठाकुर , विश्वनाथ आवलवार ,विश्वनाथ कोंडे , आदीनी केले असून दि ५ फेब्रुवारी रोजी शिवभक्त राजेश्वर पाटील पांगरेकर यांनी शिवकथेचा दुसरा दिवशी कथाकार बाबुराव महाराज करंजीकर महाराजांचे पुजन करून आशिर्वाद घेतले .