गऊळचे भूमिपुत्र सुधाकर माधवराव तेलंग यांना NIEPA संस्था दिल्लीकडून राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार जाहीर

कंधार ; शंकर तेलंग


गऊळ तालुका कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले भूमिपुत्र सुधाकर तेलंग यांनी नवीन उपक्रम राबवून महाराष्ट्र मध्ये नाव कमल.
महाराष्ट्रावर करोना रोगाचं संकट असताना. अनेक कामे थांबली गेली. त्यावेळेस साहेबांनी विद्यार्थी-पालक आपल्या अडचणी कामासाठी ऑफिस पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यावेळेस त्यांनी बोर्ड आपल्या दारी असे उपक्रम राबविण्यास यशस्वी ठरले आहे.

     लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा सचिव सुधाकर तेलंग यांना राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार मिळाला   आहे. 

        राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सहा अधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळालेला असून त्यामध्ये सर्वप्रथम गऊळ चे भूमिपुत्र सुधाकर पाटील तेलंग यांचा समावेश झालेला आहे. त्यामुळे गावातील लोक तसेच पालक विद्यार्थी साहेबांचं कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *