भारतात होळी आणि रंगपंचमी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. देशभरातील प्रमुख सणांपैकी एक असा हा होळीचा सण नवरंगांची उधळण करतो. देशभरातील विविध ठिकाणी विविध पद्धतीने साजरा केला जातो. होळी सण साजरा करण्याचे धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक, शास्त्रीय, वैज्ञानिक असे अनेक कंगोरे आहेत. उत्तर भारतात या सणाला अधिक महत्त्व आहे. होळीनिमित्त पुरणपोळी, खीर, भांग अशा अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल असते. रंगांची उधळण करणाऱ्या या सणाला गाण्यांचीही मेजवानी असते. पाहूया होळीदिनी हमखास लावली जाणारी सुपरहिट गाणी…
होळी जसजशी जवळ येते तसतशी होळीची गाणी आपल्याला सहज आठवतात. शास्त्रीय चिजा, ठुमऱ्या, होरी यांपासून ते फिल्मी संगीतापर्यंत अनेक रचना डोक्यात पिंगा घालायला लागतात. त्यातलीच ही निवडक गाणी जी की अजाअमर झाली आहेत…
…होली के दिन दिल खिल जाते है…रंगों में रंग मिल जाते है गिले शिकवे भूलकर दोस्तों, दुश्मन भी गले मिल जाते हैं….
शोले या चित्रपटातल्या या गाण्यामुळे होळीला उत्साह येतो. धर्मेंद्र-हेमा मालिनी यांचा अभिनय आणि त्यांना अनुक्रमे किशोर कुमार आणि लताबाई यांनी दिलेला आवाज, राहुलदेव बर्मन यांचं संगीत, आनंद बक्षी यांचं गीत हे मिश्रण एकदम होळीच्या भांगेसारखं एकजीव झालंय.
…. ओ होली आयी होली आयी देखो होली आयी रे खेलो खेलो रंग है, कोई अपने संग है, भिगा भिगा अंग है बहकी बहकी चाल है, चेहरा नीला लाल है, दिवाना क्या हाल है हो मस्त पर है मस्ती छायी, देखो होली आयी रे…
अनिल कपूर, रति अग्निहोत्री यांची मुख्य भूमिका असलेला मशाल हा चित्रपट १९८४ला प्रदर्शित झाला. यातलं किशोर तुमार, महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं म्हणजे मराठी गाण्याच्या चालीचा हिंदीला चढवलेला साज आहे. पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी ‘जैत रे जैत’ चित्रपयातल्या ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गीताची चाल या गीताला दिली आहे.
…इतना मजा क्यू आ रहा है, तूने हवा में भांग मिलाया, दुगना नशा क्यू हो रहा है, आखों से मीठा तूने खिलाया…बलम पिचकारी जो तूने मुझे मारी ये जवानी है दिवानी या २०१३ मधल्या चित्रपटातलं हे गाणं असंच सहज ओठांवर येतं. रणबीर कपूर, दिपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉयकपूर यांचा अभिनय धमाल उडवून देतो. हे गाणं विशेष स्मरणात राहतं याचं कारण, या गाण्यामध्ये केवळ होळीचा सीन नाहीये. त्यात एक स्टोरी दडलेली आहे किंवा हे गाणं पुढच्या स्टोरीला जन्म देतं की काय असं पाहणाऱ्याला सतत वाटत राहतं. …
याच बरोबर मराठीतली ही अनेक गाणी होळी निमित्तान खुप प्रसिद्ध झालालेली आहे ते ते ही
जेसे की,खेळतांना रंग बाई होळीचा….
आला होळीचा सण लय भारी….अश्या बर्याच गाण्यांशिवाय
आपली होळी आणि रंगपंचमी पुर्ण होत नाही…
तर चला मैत्र आणि मैत्रिणींनो या गाण्यावर थिरकत रंगपंचमीचा आनंद लुटुया…. पण होळी खेळताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याचं भान असू द्या. हा एकमेव दिवस आहे जिथे आपण वेड्यासारखं वागू शकतो. एकमेकांवर फुगे फोडून “बुरा ना मानो होली है” असं बोलून माफी ही मागू शकतो. पण काळ बदलला तसं होळीची व्याख्याही आता बदलायला हवी. आणि नैसर्गिक रंगांचा जास्तीत जास्त वापर करावा..
रंग आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. होळीचा सखोल अर्थ म्हणजे रंगानी आपले जग सजवणे. फक्त आयुष्य जगायचं म्हणून जगू नका. तर प्रत्येक दिवस आनंदने साजरा करा. ही होळी सुरक्षित खेळा आणि रोज आपले आयुष्य रंगपंचमीच्या रंगांसारखे जागा….
सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.
रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211