कोणी कितीही विरोध केला तरी नांदेडचा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-ना.अशोकराव चव्हाण -डिजिटल सदस्य नोंदणीत जिल्हा राज्यात अव्वल आणण्याच्या केल्या सूचना


नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्याचा होत असलेला विकास अनेकांना पाहवत नाही. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठले असून विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. आगपाखड केली जात आहे .वास्तविक कोणी कितीही विरोध केला तरी नांदेड जिल्ह्याचा विकास थांबणार नाही .नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू देणार अशी निःसंदिग्ध ग्वाही देतानाच काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीत नांदेड जिल्हा राज्यात अव्वल आला पाहिजे यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज दिल्या.


पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदेड येथील भक्ती लॉन्समध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. नांदेड जिल्हा प्रभारी संपत कुमार, काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी पी सावंत , माजी खा.तुकाराम रेंगे पाटील,माजी खासदार सुभाष वानखेडे आ.मोहनअण्णा हंबर्डे,आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आ. अविनाश घाटे, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, डिजीटल नोंदणीचे शहर समन्वयक विजय येवनकर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा नेरलकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जि.प.च्या मागी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यावेळी उपस्थिती होती.


काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणीसाठी सध्या अभियान सुरू आहे. या डिजिटल सदस्य नोंदणीत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रत्येक गण, वार्ड, गटात आणि गावागावात जाऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी झाली पाहिजे .नांदेड जिल्हा विकासात ज्या पद्धतीने सर्वात पुढे आहे. त्या पद्धतीनेच सदस्य नोंदणीतही नांदेड जिल्हा अव्वलस्थानी राहिला पाहिजे .यासाठी जोमाने कामाला लागा असे सूचनाही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिल्या .नांदेड जिल्ह्याचा होत असलेल्या विकास हा विरोधकांना पाहवत नसल्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. सर्व आरोपांचा विधानसभेत मी समाचार घेतला आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. त्यांना विकास करता आला नाही . उलट विकास कामात खोडा घालण्याची त्यांची प्रवृत्ती घातक आहे, असेही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले . येत्या पाच दिवसात सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण करायचे असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात राहून सदस्य नोंदणीचे लक्ष गाठावे असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपला प्रयत्न सुरूच आहे . नांदेड येथून निर्माण होणाऱ्या तिरंगा झेंड्याचे निर्मिती अधिक दर्जेदार व्हावी. येथे शाश्‍वत मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः चर्चा केली. निश्‍चितपणे या कामाचा प्रश्‍न मार्गी लागेल. यासाठी आपण मदत करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे .त्यामुळे लवकरच नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लागेल. एक अद्ययावत असे हे स्मारक होईल आणि नांदेडच्या वैभवात भर पडेल. कुरुंदकर गुरुजींच्या विचारांचा वारसा नांदेडकरांना जपता यावा या अनुषंगाने आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .
आगामी निवडणुकांमध्ये निश्‍चितपणे काँग्रेस पक्षाला सर्वाधिक बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या चार नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे . आगामी काळातही काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष राहील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागली पाहिजे यासाठी आतापासूनच कामाला सुरुवात करा असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना सहप्रभारी संपतकुमार यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. अतिशय शांत डोके ठेवून कमी बोलत आपल्या कामातून पक्षाची ताकद वाढविण्याचे काम पालकमंत्री अशोकराव चव्हाण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी केवळ अशोकराव चव्हाण यांच्यामुळेच जिल्ह्यामध्ये कोटयवधी रुपयांचा निधी मिळत असल्याचे सांगतानाच भाजपा फक्त स्वतःचा ढोल वाजून घेत आहे. परंतु वास्तवात केवळ 29 पैकी 11 राज्यामध्येच भाजपाला पूर्ण बहुमत आहे.
यावेळी बोलताना काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की, डिजिटल सभासद नोंदणीमध्ये नांदेड जिल्हा अव्वलस्थानी येण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागले पाहिजे. उरलेल्या पाच दिवसात या कामात स्वतःला झोकून देऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केली तर निश्‍चितच आपण विक्रमी नोंदणी करु असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात सुरु असलेल्या डिजिटल सभासद नोंदणीची माहिती सांगितली. तर डिजिटल सभासद नोंदणीचे समन्वयक विजय येवनकर यांनी डिजिटल नोंदणी कशा प्रकारे करावे याचे प्रात्याक्षिक करुन दाखवितानाच शहराच्या विविध प्रभागात सुरु असलेल्या सभासद नोंदणीची माहिती दिली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर यांनी सभासद नोंदणीत युवकांचा सहभागाविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे तर उपस्थितांचे आभार किशोर स्वामी यांनी मानले.
यावेळी आ.अमरनाथ राजूरकर यांची विधान परिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर सभासद नोंदणीत उत्कृष्ट काम केलेल्या संघरत्न कांबळे, वर्षाताई संजय भोसीकर, शशीकांत हटकर, गजानन अप्पाराव, दत्ताहरी पा.चोळाखेकर, संदिप मारोती बरगे, मनोज मधुकरराव ढगे, सूर्यकांत रेड्डी, गौतम गोविंदराव कसबे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मिनल खतगावकर, महिला काँग्रेसच्या मंगलाताई निमकर, डॉ.रेखा चव्हाण, सुमती व्याहाळकर, मंगलाताई धुळेकर, अनिता हिंगोले, कविता कळसकर,अनुजा तेहरा, मिनाक्षी कागडे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड.निलेश पावडे, संभाजीराव भिलवंडे, आनंद भंडारे, जगदीश पाटील भोसीकर, उध्दवराव पवार, रंगनाथ भुजबळ, प्रल्हाद पाटील ढगे, बालाजी गव्हाणे, भाऊसाहेब मंडलापूरकर, प्रितम देशमुख, बालाजी पांडागळे, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,उमाकांत पवार, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मारोती पाटील संकतीर्थकर, विकी राऊतखेडकर, नितीन पाटील झरीकर, संतोष बोनलेवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कोणी कितीही विरोध केला तरी नांदेडचा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-ना.अशोकराव चव्हाण
डिजिटल सदस्य नोंदणीत जिल्हा राज्यात अव्वल आणण्याच्या केल्या सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *