अंतर्मनाची स्वच्छता हीच सर्वोच्च स्वच्छता- प्राचार्य डॉ. जी.आर. पगडे

कंधार


दिनांक 26- 3- 2020 रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कंधारे वाडी येथे युवकांसाठी आयोजित विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.आर. पगडे यांनी वरील उद्गार काढले. पुढे बोलताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्या गावातील अंतर्गत हेवेदावे, अंधश्रद्धा, अज्ञान, बेकारी, अनारोग्य, निरक्षरता घालवण्यासाठी अंत:करण स्वच्छ पाहिजे. तरच यशाची कोणतेही शिखर गाठता येते आणि हीच सर्वोच्च स्वच्छता आहे. आणि शक्य आहे- खरे शिक्षण,मूल्याधारित शिक्षण अशा सुशिक्षित अंत:करणातच हेव्यादाव्यांना थारा मिळणार नाही, मनात अंधश्रध्देचा जन्म होणार नाही, अज्ञानाचे समूळ नष्ट करता येईल, बेकारीला पर्याय निर्माण होईल, आरोग्य सांभाळण्याची ऊर्जा मिळेल, निरक्षरतेचा अंत होईल असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना- त्या गावातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वाची भूमिका आहे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेम राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक सदैव तत्पर असायला पाहिजे तरच राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी डॉ. कासार, डॉ.
सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवानराव कंधारे यांनी ही आपल्या भाषणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक मारोतराव मंगनाळे, माजी सरपंच आयनाथराव कंधारे, केशवराव कंधारे, ग्रामपंचायत सदस्य बाबू महाराज स्वामी, अॅड.कृष्णा गोटमवाड, अंबादास मोकमपल्ले, स्वयंसेवक, महाविद्यालयातील श्री सुधाकर कौसले, ग्रंथपाल सुनील आंबटवाड, विकी यन्नावार, सचिन फुलवरे, ब्रह्माजी तेलंग, शेख अलीम आदी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुकाराम खंदारे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एल. डोम्पले यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *